---Advertisement---

कर्णधार रहाणेने KKR च्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं? सामना संपताच म्हणाला…

---Advertisement---

शुभमन गिल (90) आणि साई सुदर्शन (52) यांच्या शानदार खेळी आणि त्यानंतर गोलंदाजीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव करून आयपीएल 2025 मधील आपला सहावा विजय नोंदवला. या विजयासह, गुजरात टायटन्सचे 8 सामन्यांत 12 गुण झाले आहेत. ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. त्याच वेळी, कोलकाता संघ 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने तीन विकेट गमावून 198 धावा केल्या. गिलने सुधरसनसोबत पहिल्या विकेटसाठी 114 धावांची आणि जोस बटलर (नाबाद 41) सोबत 58 धावांची भागीदारी केली. बटलरनेही 23 चेंडूत आठ चौकारांसह एक तुफानी खेळी केली. 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार अजिंक्य रहाणे (50 ) आणि अंगकृष रघुवंशी (नाबाद 27 ) यांच्या अर्धशतकांनंतरही कोलकाता संघाला केवळ 159 धावाच करता आल्या. गुजरातकडून रशीद खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर साई किशोर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आयपीएल 2025 मध्ये कोलकाता संघाला पहिल्यांदाच सलग 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलकात्याचा घरच्या मैदानावर हा सलग दुसरा पराभव आहे. गुजरातकडून 39 धावांनी झालेल्या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, या विकेटवर 199 धावांचे लक्ष्य साध्य करता येईल. आमचा प्रयत्न गुजरातला 200 धावांपर्यंत रोखण्याचा होता आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. गोलंदाजांबद्दल कोणतीही तक्रार नाही, पण फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. विशेषतः मधल्या षटकांमध्ये धावा काढण्याची गरज आहे.

त्याने क्षेत्ररक्षण सुधारण्यावरही भर दिला. तो म्हणाला की क्षेत्ररक्षण हा देखील एक पैलू आहे जिथे सुधारणा करता येतात. जर मैदानावर 10-15 धावा वाचवू शकलात तर ते संघासाठी नेहमीच चांगले असते. या फॉरमॅटसाठी तुमच्याकडून धाडसाची आवश्यकता आहे. त्याचा असा विश्वास आहे की आपल्याला एक संघ म्हणून आणि एक फलंदाजी युनिट म्हणून धाडसी खेळ खेळण्याची गरज आहे. कोलकाता संघ आता 26 एप्रिल रोजी पंजाब किंग्जशी सामना करेल. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथेही खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---