कोलकाता नाईट रायडर्सच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आंद्रे रसेलचा समावेश आहे. आयपीएल 2025 मध्ये रसेल संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. केकेआरचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध आहे. हा सामना आज शनिवारी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या सामन्यात रसेल एक खास विक्रम करू शकतो. यासाठी त्याला फक्त 16 धावांची आवश्यकता आहे.
खरंतर, आंद्रे रसेलने 127 आयपीएल सामन्यांमध्ये 2484 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 11 अर्धशतके झळकावली आहेत. रसेलने आणखी 16 धावा केल्यास तो 2500 धावांचा टप्पा गाठेल. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलचा 40 वा खेळाडू ठरेल. रसेलने हे करताच, तो अनेक महान खेळाडूंना मागे टाकेल. या यादीत स्टीव्ह स्मिथचेही नाव आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आतापर्यंत 252 सामन्यांमध्ये 8004 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 8 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत. शिखर धवन यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 222 सामन्यांमध्ये 6769 धावा केल्या आहेत. धवनने 2 शतके आणि 51 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 257 सामन्यांमध्ये 6628 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 6565 धावा केल्या आहेत.
गेल्या हंगामात आंद्रे रसेलने 15 सामने खेळले. ज्यात त्याने 222 धावा केल्या. तर 2023 मध्ये, त्याने 14 सामन्यांमध्ये 227 धावा केल्या. आंद्रे रसेलने गोलंदाजीतही आपली प्रतिभा दाखवली आहे. त्याने 84 सामन्यांमध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत. रसेलची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका सामन्यात 15 धावा देऊन 5 बळी घेणे आहे. तो पुन्हा एकदा केकेआरसाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.






