आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघ अनेक दिग्गज खेळाडूंना सोडण्याची शक्यता आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचाही समावेश होऊ शकतो. केएल राहुल हा लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. पण यावेळी तो संघ बदल करू शकतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही. नुकताच केएल राहुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहे.
वास्तविक ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. राहुलला आरसीबीबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यावर राहुल म्हणाला, ‘असे होईल अशी आशा आहे’. अलीकडेच लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलची भेट घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोयंका यांनी राहुलमध्ये रस दाखवला नाही. पण राहुल लखनऊ कुटुंबाचा एक भाग असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
I’m happy that KL Rahul knows about the rumours that are going around for him & RCB.
Please boss change your IPL team! 🙏❤️ pic.twitter.com/Os06Uj39gQ
— Kunal Yadav (@Kunal_KLR) September 14, 2024
मागील आयपीएल हंगाम लखनऊ सुपर जायंट्ससाठी चांगला नव्हता. संघ मालक गोयंकाही यावर खूश नव्हते. त्यांनी नुकतेच झहीर खानचा संघात समावेश केला आहे. झहीरच्या आगमनामुळे गोलंदाजांना मोठी मदत मिळणार आहे. यासोबतच तो संघाची रणनीतीही बनवेल. मेगा लिलावात झहीर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे संघ राहुलला सोडतो की त्याला कायम ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
केएल राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 132 सामने खेळले आहेत. त्याने 4683 धावा केल्या आहेत. दरम्यान राहुलने या स्पर्धेत 4 शतके आणि 37 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 132 धावा आहे. राहुलने गेल्या मोसमात 14 सामन्यांत 520 धावा केल्या होत्या.
हेही वाचा-
3 क्रिकेटपटू ज्यांना न्यूझीलंड मालिकेसाठी मिळू शकते संधी; देशांतर्गत क्रिकेटमध्ये कहर कामगिरी
विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळला, ‘मी चांगला क्रिकेटर होतो, पण…’, बड्या नेत्याचा मोठा खुलासा
प्रमुख कसोटी मालिकेतून भारतीय खेळाडू बाहेर, आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून पुनरागमन करणार!