आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केन विल्यमसनच्या नावानं झाली. न्यूझीलंडचा हा दिग्गज फलंदाज लिलावाच्या पहिल्या फेरीत विकला गेला नाही. त्याच्यानंतर न्यूझीलंडचाच झंझावाती फलंदाज ग्लेन फिलिप्सही विकला गेला नाही. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या फेरीत मराठमोळा अजिंक्य रहाणे, मुंबईचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिले. या तिघांवर एकाही संघानं बोली लावली नाही. विशेष म्हणजे, पृथ्वी शॉनं त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये ठेवली होती. तर अजिंक्य रहाणेची बेस प्राईज 1.50 कोटी होती. शार्दुल ठाकूरची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन गेल्या दोन मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता, पण दुखापतीमुळे तो अनेक सामने खेळू शकला नाही. मेगा लिलावात विल्यमसनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, परंतु कोणत्याही संघानं त्याच्यावर बोली लावली नाही. ग्लेन फिलिप्स 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, पण त्यालाही कोणी खरेदीदार मिळालेला नाही. वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू रोव्हमन पॉवेल याला कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर यांना लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणीही खरेदीदार मिळाला नाही. मात्र असं नाही की ते विकले जाणार नाही. पहिली फेरी संपल्यानंतर त्यांचं नाव पुन्हा लिलावात पुकारलं जाईल. अशावेळी जर कोणत्याही संघाला बजेटनुसार त्यांना खरेदी करायचं असेल, तर ते यांच्यावर बोली लावू शकतात.
हेही वाचा –
IND vs AUS: पर्थ विजयाचे एक-दोन नव्हे तर पाच शिलेदार, बुमराह-यशस्वीसह हे देखील तितकेच असरदार!
पर्थ कसोटीतील लाजिरवाण्या पराभवावर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया; म्हणाला…
WTC Points table; ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया अव्वल स्थानी, ऑस्ट्रेलियाची चक्क इतक्या स्थानी घसरगुंडी!