आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. वृत्तानुसार, लिलावाचं ठिकाणही निश्चित करण्यात आलंय. यावेळी आयपीएलचा मेगा लिलाव सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना रिटेन केलेल्या आणि रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल.
आयपीएलचा शेवटचा लिलाव दुबईत पार पडला होता. परंतु यावेळी सौदी अरेबियामध्ये लिलाव होऊ शकतो. मेगा लिलावासाठी आणखी शहरं देखील शर्यतीत होती. लंडन आणि सिंगापूरचाही विचार केला गेला. ‘स्टारस्पोर्ट्स’नं दिलेल्या वृत्तानुसार, लिलावासाठी रियाधची निवड करण्यात आली आहे. रियाधचा टाइम झोन भारताच्या दृष्टीने योग्य मानला जातो. यासोबतच प्रसारणाच्या बाबतीतही सुलभता येईल.
लिलावाचं ठिकाण फायनल केलं जात आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व 10 फ्रँचायझींशी संबंधित अधिकारी लिलावासाठी रियाधला पोहोचतील. त्यांच्यासोबत जिओ आणि डिस्ने स्टार्सची एक मोठी टीमही जाणार आहे. हा लिलाव जिओ आणि स्टारवर थेट प्रसारित केला जाऊ शकतो.
सर्व संघांना 31 ऑक्टोबरपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. ही यादी त्यांना बीसीसीआयकडे सादर करावी लागेल. यानंतर लिलावाची वेळ येईल. त्यावेळी अनेक मोठे खेळाडू संघ बदलू शकतात. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या नावाची खूप चर्चा आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सनं रोहितला कर्णधारपदावरून हटवलं होतं. परंतु ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनुसार, मुंबई रोहितला रिटेन करू शकते. त्याच्यासह सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनाही रिटेन केलं जाऊ शकतं.
हेही वाचा –
कोहली शून्यावर बाद होऊनही रेकॉर्ड बनवतो, या बाबतीत महेंद्रसिंह धोनीला टाकलं मागे
शून्यावर फेकली विकेट, बांगलादेश पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धही विराट कोहली फ्लॉप!
भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीतून शुबमन गिल बाहेर, धक्कादायक कारण जाणून घ्या