आयपीएल 2025 चा हंगाम खूप रोमांचक होणार आहे. या वर्षी अनेक खेळाडू आपला संघ बदलणार आहेत. वास्तविक, आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यामुळे सर्व संघांना 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी असेल. इतर सर्व खेळाडूंना रिलिज करावं लागेल. मात्र मेगा ऑक्शन पूर्वी देखील काही खेळाडू आपला संघ बदलू शकतात. नियमांनुसार, ऑक्शनच्या आधी संघ आपल्या खेळाडूंना ट्रेड करू शकतो. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि रिषभ पंत आपापल्या संघांची साथ सोडू शकतात. म्हणजेच, राहुल लखनऊ सुपर जायंट्स आणि रिषभ दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडेल. रिपोर्टनुसार, राहुल लखनऊची साथ सोडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूत सामील होऊ शकतो. तो यापूर्वीही आरसीबीकडून खेळला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. मुंबईचे तीन मोठे खेळाडू संघाची साथ सोडू शकतात. यामध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये शामिल होण्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र अद्याप यावर दिल्लीकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, चेन्नईची टीम रिषभला ट्रेडच्या माध्यमातून आपल्या संघात शामिल करून घेऊ शकते. केएल राहुल देखील आरसीबीत याच माध्यमातून परतू शकतो.
तसेच बातमी आहे की, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा संघाची साथ सोडू शकतात. रिपोर्टनुसार, फ्रँचाईजी कोचिंग स्टाफमधील भूमिकेसाठी युवराज सिंगसोबत चर्चा करत आहे. युवराज संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्या जवळचा मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलची रंगत वाढणार, 6 वर्षांनंतर युवराज सिंगची एन्ट्री होणार? ‘या’ दिग्गजाची जागा घेणार
ऑल इज वेल! कर्णधारपदाच्या निर्णयानंतर खटके उडण्याऐवजी हार्दिकची सूर्यकुमारला ‘जादू की झप्पी’
“एक दिवस शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल”, माजी फलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा