आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलनं शनिवारी (28 सप्टेंबर) बंगळुरू येथे झालेल्या बैठकीनंतर आयपीएल 2025 साठी नवे नियम जाहीर केले. यावेळी अनेक नियमांमध्ये मोठे बदल दिसून आले. आता मेगा लिलावापूर्वी संघ एकूण 6 खेळाडूंना रिटेन करू शकतील. दरम्यान, वादग्रस्त ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हा नियम कायम राहणार की नाही? हे बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
आयपीएल 2024 दरम्यान ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अनेक दिग्गजांचा विश्वास आहे की, इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे संघातील अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी होत आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी हा नियम हटवण्याची मागणीही केली होती. विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या मोठ्या खेळाडूंनी या नियमाविरोधात आवाज उठवला होता.
आता बीसीसीआनं स्पष्ट केलं आहे की, आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम कायम राहणार आहे. हा नियम आयपीएल 2027 पर्यंत लागू असेल. बीसीसीआयनं आयपीएल 2023 मध्ये हा नियम आणला होता. सुरुवातीपासूनच या नियमाबाबत लोकांची वेगवेगळी मतं आहेत. मानलं जात आहे की, इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळत आहे. मोठ्या स्कोअरचे सामने चाहत्यांचं अधिक मनोरंजन करतात. अशा परिस्थितीत बीसीसीआय हा नियम हटवण्याच्या मूडमध्ये नाही.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघ एकूण 6 खेळाडूंना रिटेन करू शकतील. मात्र यामध्ये 5 कॅप्ड आणि 1 अनकॅप्ड खेळाडूचा समावेश असेल. संघ जास्तीत जास्त 5 कॅप्ड आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करू शकतील.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. आता बीसीसीआय मेगा लिलावाची तारीख कधी जाहीर करते, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा –
आता मनमानी चालणार नाही! ऑक्शननंतर ऐन वेळेवर माघार घेणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू
IPL 2025 Retention Rules; रिटेंशन नियमात मोठे बदल, RTM कार्डचाही वापर होणार