आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचं आयोजन होणार आहे. या लिलावावर सर्व चाहत्यांच्या नजरा आहेत. लिलावापूर्वी संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल आणि कोणाला जाऊ देईल, याबाबत आत्तापासूनच अंदाज बांधले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं आयपीएल रिटेन्शन संबंधी नवे नियम जाहीर केले. या नियमांनुसार, आता संघ मेगा लिलावापूर्वी 5 खेळाडूंना रिटेन करू शकतो. याशिवाय एक राईट टू मॅच (RTM) चा पर्याय उपलब्ध असेल. जर एखाद्या संघानं एकाही खेळाडूला रिटेन केलं नाही, तर त्या संघाकडे ऑक्शनमध्ये 6 राईट टू मॅच कार्ड वापरण्याचा पर्याय असेल.
आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादनं फायनलपर्यंत मजल मारली होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघातील युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करणं ही संघासाठी मोठी डोकेदुखी असेल. आता यासंबंधी एक मोठी बातमी समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मेगा ऑक्शनपूर्वी सनरायझर्स हैदराबाद उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि एडन मार्करम यांना रिलिज करू शकते. मार्करम आयपीएल 2023 मध्ये संघाचा कर्णधार होता. तर भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून संघासोबत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबाद कर्णधार पॅट कमिन्ससह ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांना रिटेन करू शकतो .
सनरायझर्स हैदराबाद फ्रँच्याईजीनं आयपीएल 2013 मध्ये पदार्पण केलं होतं. संघानं 2016 मध्ये पहिलं विजेतेपद पटकावलं. त्या हंगामातील फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद आयपीएलमधील आपलं दुसरं विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.
हेही वाचा –
गौतम गंभीरचा नादच खुळा! टी20 मालिकेत घेतलेले हे 3 मोठे निर्णय ठरले मास्टरस्ट्रोक!
कर्णधारपद गेलं, आता टीममधूनही होणार बाबर आझमची हकालपट्टी! पीसीबी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भारताचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, संघानं दिली मोठी जबाबदारी