आयपीएलमध्ये दर तीन वर्षांनी मेगा लिलाव आयोजित करण्याचा नियम आहे. गेल्या वेळी आयपीएल 2022 पूर्वी मेगा लिलाव झाला होता. आता आयपीएल 2025 च्या आधी हा लिलाव होणार आहे. मेगा लिलावाच्या माध्यमातून अनेक मोठे खेळाडू ऑक्शनमध्ये उतरतात. त्यामुळे याबाबत चाहत्यांमध्ये फार उत्सुकता असते.
मात्र यंदाच्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयनं अद्याप खेळाडूंना रिटेन करण्याच्या नियमाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. याबाबत मीडियामध्ये अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला आयपीएल 2025 शी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय. लिलावाची संभाव्य तारीख, ठिकाण आणि संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे, हे या बातमीद्वारे जाणून घ्या.
राईट टू मॅच (RTM) कार्डचे नियम काय आहेत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आरटीएम कार्डचा नियम परत येईल. याद्वारे, सर्व फ्रँचायझी मेगा लिलावात त्यांच्या 2 ते 3 खेळाडूंना परत खरेदी करू शकतात. मात्र यासाठी फ्रँचायझीला तितकीच रक्कम खर्च करावी लागेल, जेवढी दुसऱ्या संघानं लिलावात त्या खेळाडूसाठी बोली लावली आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलाव कधी आणि कुठे होईल?
आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव डिसेंबर 2024 किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेला दोन दिवस लागू शकतात. आयपीएल 2022 चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात झाला होता. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव दिल्ली, मुंबई किंवा कोलकाता यापैकी कोणत्याही एका शहरात होऊ शकतो.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू (3 भारतीय आणि 1 विदेशी) रिेटेन करण्याची परवानगी होती. हाच नियम यावेळीही लागू झाल्यास फ्रँचायझी या खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाइट रायडर्स – आंद्रे रसेल, सुनील नारायण, श्रेयस अय्यर, हर्षित राणा
गुजरात टायटन्स – शुबमन गिल, मोहम्मद शमी, राशिद खान, साई सुदर्शन
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू – विराट कोहली, मोहम्मद सिराज, कॅमेरुन ग्रीन, यश दयाल
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जॅक फ्रेझर-मॅकगर्क
चेन्नई सुपर किंग्ज – एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल, मयंक यादव, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन
पंजाब किंग्स – अर्शदीप सिंग, आशुतोष राणा, शशांक सिंग, सॅम करन
हेही वाचा –
हत्येचा आरोपी शाकिब भारतात खेळण्यासाठी येणार, कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर
काय सांगता! एकाच संघाकडून खेळणार विराट कोहली अन् बाबर आझम? या स्पर्धेत जुळतील योग
टीम इंडियातील पुनरागमन लांबलं! दुलीप ट्रॉफीत ऋतुराज गंभीर जखमी