शनिवारी (28 सप्टेंबर) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं मेगा ऑक्शनच्या रिटेनशनशी संबंधित नियम जाहीर केले. नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जे खेळाडूंना रिटेन करण्याच्या आणि मेगा लिलावात सहभाग होण्यासंबंधी आहेत.
आयपीएलच्या पुढील हंगामासाठी संघ जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन करू शकतात. यामध्ये राईट टू मॅच कार्डचा पर्याय समाविष्ट आहे. मात्र या खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त 5 कॅप्ड खेळाडूंचा समावेश असू शकतो, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या जास्तीत जास्त 2 असू शकते. अशा परिस्थितीत फ्रँचायझी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी कधी जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल एक मोठं अपडेट नुकतच समोर आलंय.
‘क्रिकबझ’नं आपल्या अहवालात सांगितलं आहे की, सर्व फ्रँचायझींना आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी अंतिम करून सबमिट करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ असेल. विशेष म्हणजे, तोपर्यंत जर एखादा अनकॅप्ड खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करतो, तर तो कॅप्ड खेळाडू मानला जाईल.
सर्व फ्रँचायझींना पुढील हंगामासाठी जास्तीत जास्त पाच खेळाडूंना रिटेन करण्याचा पर्याय असेल, परंतु यासाठी त्यांना त्यांच्या 120 कोटी रुपयांच्या पर्समधून 75 कोटी रुपये खर्च करावे लागतील. रिटेन केलेल्या कॅप्ड खेळाडूंपैकी पहिल्या खेळाडूला 18 कोटी रुपये, दुसऱ्या आणि तिसऱ्या खेळाडूला अनुक्रमे 14 कोटी आणि 11 कोटी रुपये मिळतील. तर शेवटच्या दोन खेळाडूंना फ्रँचायझीसाठी 32 कोटी रुपये खर्च करावे लागतील. चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला 18 कोटी आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 14 कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर अनकॅप्ड खेळाडूला रिटेन करण्यासाठी 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
हेही वाचा –
आयपीएल 2025 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम असणार की नाही? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू
आता मनमानी चालणार नाही! ऑक्शननंतर ऐन वेळेवर माघार घेणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका