---Advertisement---

स्वप्नवत कामगिरी! पदार्पणातच अश्विनी चमकला, केकेआरच्या दिग्गजांना पाजलं पाणी

On: मंगळवार, एप्रिल 1, 2025 8:12 AM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2025 चा 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने 23 वर्षीय अश्विनी कुमारला पदार्पणाची संधी दिली आणि या युवा खेळाडूने कर्णधाराला निराश केले नाही. केकेआर विरुद्ध, अश्विनीने 3 षटकांत 24 धावा देत 4 बळी घेतले. जर हार्दिकने त्याला आणखी एक षटक दिले असते तर तो डावाची सुरुवात करू शकला असता. मात्र, या चार विकेट्ससह, अश्विनी कुमारने इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 4 बळी घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

याआधी कोणत्याही भारतीयाला पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करता आलेली नाही. पदार्पणाच्या सामन्यात त्याची 24/4 ही कामगिरी स्पर्धेतील चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. अश्विनीने अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेलच्या रूपात चार मोठ्या विकेट्स घेतल्या. त्याने त्याच्या पहिल्याच आयपीएल चेंडूवर रहाणेला बाद केले. अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा चौथा गोलंदाज ठरला.

मुंबईसाठी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज-

अली मुर्तझा विरुद्ध आरआर, 2010 (नमन ओझा)
अल्झारी जोसेफ विरुद्ध एसआरएच, 2019 (डेव्हिड वॉर्नर)
डेवाल्ड ब्रेव्हिस वि आरसीबी, 2022 (विराट कोहली)
अश्विनी कुमार विरुद्ध केकेआर, 2025(अजिंक्य रहाणे)*

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---