इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामापूर्वी, मेगा लिलावात संघांत मोठे बदल होऊ शकतात. त्याचप्रमाणे आयपीएल संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये एकामागून एक बदल होताना दिसत आहेत. दरम्यान, भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल गुजरात टायटन्समध्ये सामील झाल्याची बातमी आहे.
सध्या आयपीएलच्या मेगा लिलावाची प्रतीक्षा चाहते, खेळाडू, फ्रँचायझी सर्वांनाच आहे. या मोठ्या लिलावापूर्वी पार्थिव पटेल गुजरात टायटन्समध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून सामील होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, गुजरात टायटन्स माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाला आपल्या संघाचा फलंदाज मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणार आहे.
आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्सची कामगिरी गेल्या मोसमात खूपच खराब होती. त्यानंतर आता ते हा मोठा बदल करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन हे मागील 3 हंगामात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासोबत काम करत होते. परंतु सध्या ते पाकिस्तान क्रिकेट संघाचे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचे प्रशिक्षक आहेत. अशा परिस्थितीत गुजरात त्यांच्या बदलीच्या शोधात होता.
PARTHIV PATEL TO GUJARAT TITANS…!!!
Parthiv Patel set to join Gujarat as Batting Mentor for IPL 2025. [Sahil Malhotra from TOI. Com] pic.twitter.com/SCGMzLdreC
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2024
पार्थिव पटेलबद्दल सांगायचे तर, हा डावखुरा फलंदाज आयपीएलमध्ये अनेक संघांसोबत खेळला आहे. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळला असून, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या मोठ्या संघांसह आयपीएलमध्येही खेळलाय. गुजरातच्या या अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाने आयपीएलमध्ये 139 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 22.60 च्या सरासरीने आणि 120 च्या स्ट्राइक रेटने 2848 धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. 2008 ते 2019 या कालावधीत त्याने या लीगमध्ये 13 अर्धशतकेही झळकावली आहेत.
गुजरातच्या मुख्य प्रशिक्षक पदी भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा काम करतो. तसेच, इंग्लंडचे विक्रम सोळंकी या संघासोबत जोडले गेलेले आहेत. तर, भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल हा या संघाचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर गावसकर मालिका खेळणार वाॅर्नर? म्हणाला, “मी मागे हटणार…”
IND vs NZ; पुण्यातील खेळपट्टी कशी असणार? फिरकीपटूंना मिळणार मदत?
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?