---Advertisement---

IPL 2025: काय सांगता! क्वालिफायर-1 जिंकणारा संघ ठरतो चॅम्पियन? पाहा इतिहास

On: गुरूवार, मे 29, 2025 2:03 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या प्लेऑफचा थरार आजपासून सुरू होत आहे. आज (29 मे) सायंकाळी 7:30 वाजता पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात क्वालिफायर-1 सामना रंगणार आहे. या सामन्याच्या विजेत्या संघाला थेट अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. हा सामना मुल्लांपूर येथे खेळला जाईल.

या सामन्यातील पराभव म्हणजे संघ स्पर्धेतून बाद होणे नाही. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी अजून मिळेल. त्यांना 1 जून रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटर विजेत्या संघाविरुद्ध पुन्हा एकदा फायनलसाठी लढावं लागेल.

आयपीएलच्या इतिहासात एक धक्कादायक ट्रेंड दिसून आला आहे. 2011 पासून प्लेऑफ फॉरमॅट अस्तित्वात आल्यानंतर 14 पैकी 11 वेळा क्वालिफायर-1 जिंकणाऱ्या संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे यंदाही अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की, आजचा सामना जिंकणारा संघच आयपीएल 2025 चा चॅम्पियन ठरेल.

फक्त मुंबई इंडियन्स अशी एकमेव टीम आहे जिने दोनदा क्वालिफायर-1 हरल्यानंतरही ट्रॉफी जिंकली आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये एलिमिनेटरपासून सुरुवात करत थेट ट्रॉफीपर्यंत मजल मारलेली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी ही संधी खास आहे. कारण आरसीबी पुरुष संघाने आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. मात्र त्यांच्या महिला संघाने WPL (Womens Premier League) मध्ये यंदा विजेतेपद मिळवले होते. यावेळी पुरूष संघही इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.

PBKS vs RCB: कोण भारी?

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 35 सामने झाले आहेत. त्यातील 18 सामन्यांत पंजाबने बाजी मारली असून, 17 सामन्यांत बेंगळुरू विजयी ठरले आहे. मात्र 2023 पासून झालेल्या पाच सामन्यांपैकी चार आरसीबीने जिंकले आहेत. त्यामुळे फॉर्मच्या आधारे आरसीबीचं पारडं जड दिसतंय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---