माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा (Ajay Jadeja) यांनी आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सला एक सल्ला दिला आहे. एमआयने कर्णधार हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) सोडावे आणि त्यानंतर लिलावात आरटीएम कार्ड वापरावे, असा सल्ला दिला. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाला संघात कायम ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.
बीसीसीआयने शनिवारी आयपीएल 2025 रिटेन्शनचे नियम जाहीर केले. सर्व 10 फ्रँचायझींना आरटीएम कार्डसह आत्ताच्या संघातील जास्तीत जास्त 6 खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल. दोन खेळाडूंना 18-18 कोटी रुपये तर दोन खेळाडूंना 14-14 कोटी रुपये आणि एका खेळाडूला 11 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवण्यासाठी 4 कोटी रुपये मोजावे लागतील. एखाद्या संघाने 6 खेळाडूंना कायम ठेवल्यास 120 पैकी 79 कोटी रुपये खर्च होतील.
जडेजा म्हणाले की, “रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे निःसंशयपणे तीन खेळाडू आहेत ज्यांना मुंबई इंडियन्सद्वारे कायम ठेवले जाईल. मला वाटते एमआय त्यांचे आरटीएम कार्ड हार्दिक पंड्यासाठी वापरू शकते. हार्दिक हा ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्याला तुम्ही लिलावातही विकत घेऊ शकत नाही. मात्र, दुखापतींमुळे इतर फ्रँचायझी हार्दिकबद्दल संकोच करत असण्याची शक्यता आहे.”
हार्दिकपेक्षा वेगवान गोलंदाज बुमराह अधिक मौल्यवान असल्याचे जडेजांचे मत आहे. अशा परिस्थितीत हार्दिकसाठी आरटीएमचा वापर एमआयसाठी फायदेशीर ठरू शकतो. आयपीएल रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. रोहित, सूर्यकुमार, बुमराह व हार्दिक यांच्या व्यतिरिक्त देखील अनेक आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडूंच्या संघात आहेत. यामध्ये ईशान किशन व तिलक वर्मा यांच्याबाबत संघ काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे ठरेल. अनकॅप खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नेहल वढेरा, आकाश मधवाल व पियुष चावला हे पर्याय असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारे टाॅप-5 संघ
IPL 2025; “आरसीबी फक्त कोहलीलाच रिटेन करणार” माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य
SL vs NZ; कसोटीत तुटला ब्रायन लाराचा रेकाॅर्ड, गोलंदाजाने खणखणीत षटकार ठोकत टाकले मागे