---Advertisement---

मुंबईने 5 खेळाडूंना ठेवले कायम; पण रोहित, हार्दिक नव्हे तर ‘या’ खेळाडूसाठी मोजली सर्वाधिक रक्कम

On: गुरूवार, ऑक्टोबर 31, 2024 7:32 PM
Mumbai-Indians
---Advertisement---

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 साठी रिटेन केलेला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. फ्रँचायझीने एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले. ज्यात कर्णधार हार्दिक पंड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा, प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या यादीसह मुंबई रोहित शर्माला सोडणार असल्याच्या अफवेला ब्रेक लावला.

मुंबईने आपला चौथा रिटेन खेळाडू म्हणून रोहित शर्माला कायम ठेवले. याशिवाय हार्दिक पंड्या हा देखील संघाच्या रिटेन यादीचा एक भाग बनला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबईने सर्व भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आरटीएम कार्ड वापरताना ते एका अनकॅप्ड खेळाडूवरच बोली लावू शकतात.

रिटेन्शन लिस्टमध्ये मुंबईने जसप्रीत बुमराहला सर्वाधिक 18 कोटी रुपये दिले. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला प्रत्येकी 16.35 कोटींमध्ये कायम ठेवले. याशिवाय रोहित शर्माला 16.30 कोटी रुपये देऊन कायम ठेवण्यात आले. तिलक वर्मा याला सर्वात कमी 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. मुंबईने या पाच खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी तब्बल 75 कोटी रुपये खर्च केले.

आयपीएल 2025 मध्ये पाच खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर आता मुंबईकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक आहेत. आता मुंबईचा संघ आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 45 कोटी रुपयांसह उतरणार आहे. सर्व संघांना या आगामी लिलावात 120 कोटी रुपये खर्च करण्यासाठी मिळणार होते.

मुंबईकडे एक अनकॅप्ड खेळाडू रिटेन करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. मागील दोन हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी केलेला वेगवान गोलंदाज आकाश मधवाल त्यांची पसंती असू शकतात. तर, डावखुरा फलंदाज नेहल वढेरा व नमन धीर यांच्यावर देखील ते बोली लावू शकतात. तसेच, मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग नसलेला पियुष चावला हा देखील अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघाचा भाग बनण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – 

कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?

आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा
पंत-राहुलवर इतक्या कोटी रुपयांची बोली लागेल! आकाश चोप्रांनी आकडा सांगितला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---