आयपीएल 2025 च्या रिटेंशनपूर्वी (IPL 2025 Retention List) सर्वाधिक चर्चा झाली ती लखनऊ सुपर जायंट्स आणि फ्रँचायझीचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांची. मागील हंगामात राहुल आणि लखनऊचे संघमालक संजीव गोएंका (Sanjeev Goenka) यांच्यात वाद झाल्यानंतर फ्रँचायझी राहुलला संघात कायम ठेवणार नसल्याची चर्चा होती. तर राहुल स्वत:देखील लखनऊकडून खेळण्यासाठी इच्छुक नसल्याच्या बातम्या येत होत्या. यादरम्यान लखनऊने अधिकृतपणे रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
फ्रँचायझीने कर्णधार राहुलला रिटेन केले नाही. यानंतरही राहुलला पुन्हा ताफ्यात सामील करण्यासाठी संघाकडे राईट टू मॅचचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता संजीव गोएंकांच्या वक्तव्यामुळे राहुल आगामी हंगामासाठी लखनऊचा भाग नसेल, ही बाब स्पष्ट झाली आहे. लखनऊचे मालक संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे. एका अर्थी त्यांनी राहुलवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, रिटेंशन यादी समोर आल्यानंतर संजीव गोएंका म्हणाले की, ‘आम्हाला जिंकणाऱ्या मानसिकतेचे खेळाडू रिटेन करायचे होते. वैयक्तिक आकांक्षापेक्षा संघाच्या विजयाचं हीत जोपासतील अशा खेळाडूंना आम्हाला संघात ठेवायचे होतं.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर गोएंका यांचे विधान राहुलला उद्देशून असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) रिटेन केलेले खेळाडू –
निकोलस पूरन (21 कोटी)
मयंक यादव (11 कोटी)
रवी बिश्नोई (11 कोटी)
आयुष बदोनी (4 कोटी)
मोहसिन खान (4 कोटी)
हेही वाचा –
कधीकाळी सर्वाधिक फी घेणाऱ्या धोनीला सीएसकेने फक्त ‘इतक्या’ कोटींना केले रिटेन
कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?
आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा