आयपीएल 2025 मधील दहावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवले. ज्यात दिल्ली कॅपिटल्सची सांघिक अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली.
विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात टाॅस गमावून पहिल्या डावात गोलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादला 20 षटकात 163 धावांवर रोखले. विस्फोटक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदाराबाद संघाला दिल्लीने 20 षटकेही खेळू दिले नाही, मिचेल स्टार्कच्या माऱ्यासमोर हैदराबादचे गोलंदाज गुडघे टेकले. सलामीला आलेल्या ट्रॅव्हिड हेड अभिषेक शर्माची जोडी पुन्हा फ्लाॅप ठरली. अभिषेक शर्मा (1) धावबाद झाला. तर हेड 22 धावांवर बाद झाला. याशिवाय ईशान किशन (2) नितीशकुमार रेड्डी (0) यांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली.
अनिकेत वर्मा (74 धावा) व हेनरिक क्लासेन (32 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर संघाला 163 धावांचा टप्पा गाठता आला. शेवटी 18.4 षटकांत सर्व गडी गमावू संघाने 163 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने धमाकेदार सुरुवात केली. सलामी जोडीने 81 धावा जोडल्या. मात्र 10 षटकात संघाला दोन धक्के बसले, फाफ ड्यूप्लेसिस (50 धावा) व जेक फ्रेझर-मॅकगर्क (38 धावा) दोघेही बाद झाले. यांनतर अभिषेत पोरेलने मोर्चा सांभाळला. त्याने नाबाद 18 चेंडूत 34 धावा करुन संघाला विजय मिळवून दिले. त्याला ट्रिस्टन स्टब्सची चांगली साथ मिळाली. तो 21 धावांवर नाबाद राहिला. शिवाय केएल राहुलने 15 धावा केल्या. आशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने हैदाराबादला 4 षटके व 7 विकेट्सने हरवले. यासह दिल्लीने हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.