---Advertisement---

अभिषेक शर्माचं शतक, विक्रमांची तोडफोड करत हैदराबादची धडाकेबाज कामगिरी!

On: रविवार, एप्रिल 13, 2025 9:42 AM
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माने धमाका केला आहे. त्याने आयपीएल 2025 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध शतक झळकावले. अभिषेकने अवघ्या 40 चेंडूत शतक पूर्ण करून अनेक विक्रम मोडले. या खेळीदरम्यान त्याने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. ट्रॅव्हिस हेडनेही अभिषेकला खूप साथ दिली. पण तो 66 धावा करून बाद झाला.

अभिषेक पंजाब किंग्ज विरुद्ध हैदराबादकडून सलामीला आला. यादरम्यान त्याने 55 चेंडूंचा सामना करत 141 धावा केल्या. या खेळीदरम्यान अभिषेकने 14 चौकार आणि 10 षटकार मारले. या खेळीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम मोडले. अभिषेक आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा सहावा खेळाडू ठरला आहे. अभिषेकने फक्त 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला आहे. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. या यादीत ख्रिस गेलचे नाव सर्वात वर आहे. गेलने 175 धावा केल्या होत्या. ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 158 धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सने 133 धावा केल्या. तर अभिषेकने 141 धावा केल्या.

आयपीएलमधील सर्वात जलद शतकं –
30 चेंडू – ख्रिस गेल (आरसीबी), 2013
37 चेंडू – युसूफ पठाण (आरआर), 2010
38 चेंडू – डेव्हिड मिलर (पंजाब), 2013
39 चेंडू – ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद) विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, 2024
39 चेंडू – प्रियांश आर्य (पंजाब) विरुद्ध CSK, मुल्लापूर, 2025
40 चेंडू – अभिषेक शर्मा (हैदराबाद) विरुद्ध पीबीकेएस, हैदराबाद, 2025*

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---