आयपीएल 2025 मेगा लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 (आयपीएल 2025) चा दोन दिवसीय मेगा लिलाव आज (24 नोव्हेंबर) दुपारी 3:30 पासून सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरू होणार आहे. यावेळी 6 दिग्गज वेगवान गोलंदाज आयपीएल संघ मालकांच्या रडारवर असतील. यावेळी मोहम्मद शमी, मिचेल स्टार्क, कागिसो रबाडा, जेम्स अँडरसन आणि अर्शदीप सिंग यांच्यासह अनेक वेगवान गोलंदाज लिलावात विकले जाणार आहेत.
1. मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आयपीएल 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला 24.75 कोटी रुपये मिळाले होते. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याला मोठ्या बोली लागण्याची शक्यता आहे.
2. कागिसो रबाडा
दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएलमध्ये 117 विकेट घेतल्या असून आयपीएल 2025 मेगा लिलावात तो कोणत्याही संघासाठी पहिली पसंती ठरू शकतो. हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
3. मोहम्मद शमी
भारतीय संघातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद शमीने आयपीएल 2023 मध्ये पर्पल कॅप जिंकली होती. पण दुखापतीमुळे 2024 च्या हंगामात तो खेळला नाही. मात्र तो पुर्णपणे सावरला असून आयपीएल 2025 साठी सज्ज झाला आहे.
4. ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट अजूनही टी20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावामध्ये कोणत्याही संघासाठी तो एक मजबूत पर्याय असू शकतो.
5. अर्शदीप सिंग
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सर्वात महागडा वेगवान गोलंदाज बनू शकतो. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही पंजाब किंग्सने सोडलेल्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने लिलावासाठी 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह नोंदणी केली आहे.
6. जेम्स अँडरसन
या लिलावात एक नाव देखील आहे. जे या यादीत प्रथमच समाविष्ट केले आहे. परंतु ते अव्वल खेळाडूंमध्ये एक मोठे नाव आहे. इंग्लंडचा माजी गोलंदाज अँडरसनने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि प्रथमच आयपीएल लिलावासाठी स्वतःची नोंदणी केली. तो आयपीएल मेगा लिलावात 1.25 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह सहभागी झाला आहे.
हेही वाचा-
नॅथन लायनच्या जाळ्यात अडकला पंत, मोठा शॉट खेळण्याच्या नादात चारीमुंड्या चित!
IPL 2025; यंदाच्या मेगा लिलावात या दिग्गजांवर असणार सर्वांच्या नजरा, हा खेळाडू ट्रम्पकार्ड ठरणार!
शतक एक रेकॉर्ड्स अनेक! 22 वर्षांच्या यशस्वीनं केली सचिन-गावस्करची बरोबरी