---Advertisement---

IPL 2026 Mini Auction : दिल्ली कॅपिटल्सची आक्रमक चाल; नव्या चेहऱ्यांसह जेतेपदाचे स्वप्न

On: मंगळवार, डिसेंबर 16, 2025 10:06 PM
---Advertisement---

IPL 2026 च्या मिनी ऑक्शनसाठी दिल्ली कॅपिटल्सकडे (DC) 21.6 कोटी रुपयांचा पर्स शिल्लक होता. या ऑक्शनमध्ये दिल्लीने संतुलित आणि गरजेनुसार रणनीती आखत काही महत्त्वाचे खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. ऑक्शनची सुरुवातच दिल्लीने अनुभवी साउथ आफ्रिकन फिनिशर डेव्हिड मिलरला बेस प्राइसवर खरेदी करून केली. दिल्लीने मिलरला 2 कोटी रुपयांत संघात घेतले असून, मधल्या फळीत त्याच्याकडून मोठ्या योगदानाची अपेक्षा आहे.

यानंतर दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज बेन डकेट यालाही संघात स्थान दिले. डकेटच्या आगमनामुळे केएल राहुलसोबत सलामी जोडीसाठी एक मजबूत पर्याय दिल्लीला मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात दिल्लीचा टॉप ऑर्डर अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.

या मिनी ऑक्शनमधील दिल्लीचा सर्वात मोठा सौदा ठरला तो जम्मू-काश्मीरच्या युवा खेळाडू आकिब नबीसाठी. दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूवर तब्बल 8.4 कोटी रुपये खर्च केले. आकिब नबी हा या ऑक्शनमध्ये दिल्लीसाठी सर्वात महागडा खेळाडू ठरला. याशिवाय श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंका याला 4 कोटी, अनुभवी वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला 2 कोटी, तर युवा साहिल पारेखला 30 लाख रुपयांत संघात घेतले आहे. आकिब नबी नंतर निसंका हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एक महत्त्वाचा ट्रेड करत नितीश राणाला आपल्या संघात सामील करून घेतले होते. 4.2 कोटी रुपयांत झालेला हा ट्रेड दिल्लीसाठी फायदेशीर मानला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकदाही IPL विजेतेपद जिंकलेले नाही. 18 वर्षांच्या इतिहासात संघ केवळ एकदाच, 2020 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचू शकला होता. त्यामुळे यंदा या नव्या खेळाडूंसह दिल्ली खिताब जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.

IPL 2026 साठी दिल्ली कॅपिटल्सचा पूर्ण संघ – अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, केएल राहुल, कुलदीप यादव, माधव तिवारी, मिशेल स्टार्क, समीर रिजवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, नितीश राणा (ट्रेड), आकिब नबी, पथुम निसंका, बेन डकेट, लुंगी एनगिडी, काइल जेमिसन, पृथ्वी शॉ, डेव्हिड मिलर, साहिल पारेख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---