---Advertisement---

IPL 2026: केएल राहुलच्या रडारवर धोनीचा ‘हा’ बलाढ्य रेकॉर्ड, केवळ 13 धावा करताच…

On: शनिवार, एप्रिल 25, 2026 11:53 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये केएल राहुल नेहमीच उत्तम कामगिरी करत आला आहे. २०२६ च्या हंगामात त्याला या स्पर्धेच्या इतिहासात मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. आज (२५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरूवात होणार आहे.

पंजाब विरुद्ध राहुलने १३ धावा केल्या तर तो एमएस धोनीचा मोठा विक्रम माग टाकू शकतो. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामनाविजयी खेळी केली होती. त्याने या हंगामात आपल्या फलंदाजीमध्ये लक्षणीय बदल केले आहेत. सध्या त्याचा स्ट्राईक रेट जवळपास १७० असून तो प्रत्येक २.६ चेंडूमागे चौकार मारत आहे.

राहुलने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ६ डावांमध्ये १६६.६७ च्या स्ट्राईक रेटने २०५ धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. यावेळी त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९२ आहे, जी त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध केली होती, मात्र तो सामना संघाने केवळ १ धावांनी गमावला होता.

राहुल डीसीच्या आधी सनरायझर्स हैद्राबाद, आरसीबी, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळला आहे. आतापर्यंत त्याने १५१ आयपीएल सामन्यांमध्ये ४५.६० सरासरी आणि १३६.९७ च्या स्ट्राईक रेटने ५४२७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने पाच शतके आणि ४२ अर्धशतके केली आहेत. तसेच नाबाद १३२ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.

राहुल धोनीचा कोणता विक्रम मोडणार हे जाणून घेऊ. धोनीने आयपीलच्या २७८ सामन्यांमध्ये ३८.३० च्या सरासरी आणि १३७.४५ च्या स्ट्राईक रेटने ५४३९ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकाचा समावेश असून त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८४ राहिली आहे.

आयपीएलच्या इतिहासात विकेटकीपर-फलंदाज म्हणून ५० पेक्षा अधिक धावा सर्वाधिक वेळा करण्याच्या यादीत राहुलने आधीच धोनीला मागे टाकले आहे. यामध्ये राहुलने ३१ वेळा आणि धोनीने २४ वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच आजा त्याला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनीला मागे टाकण्याचीही संधी आहे. आज तो ही कामगिरी पंजाबविरुद्ध करणार का याकडे लक्ष असेल.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
१. विराट कोहली – ८९८९
२. रोहित शर्मा – ७१८३
३. शिखर धवन – ६७६९
४. डेविड वॉर्नर – ६५६५
५. सुरेश रैना – ५५२८
६. एमएस धोनी – ५४३९
७. केएल राहुल – ५४२७

८. अजिंक्य रहाणे – ५१८४
९. एबी डिविलियर्स – ५१६२
१०. सूर्यकुमार यादव – ४४३२

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---