टी-२० क्रिकेट स्पर्धेपैकी एका मोठ्या स्पर्धेचा म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा रणसंग्राम आता लवकरच सुरु होणार आहे. आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. या भारताबाहेर होणाऱ्या हंगामाची तयारी खेळाडू करीत आहेत.
हा सत्र सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या विक्ररामांची नोंद झाली आहे. या लेखात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात नोंदविलेल्या मोठ्या विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे मोडणे कठिण आहे.
आरसीबीच्या नावावर आहे आयपीएलमधील सर्वाधिक धावांची नोंद
विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी संघ अजूनही अजिंक्यपद पटकावू शकला नाही. कोहली आणि आरसीबी संघ त्यांच्या पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न नक्कीच पाहत आहेत आणि ते यंदा पूर्ण होईल का हे पाहणे मनोरंजक असेल. पण जेव्हा आयपीएलच्या काही सर्वोत्कृष्ट विक्रमांच्या नोंदीत आरसीबीचा संघ बर्याच बाबतीत पुढे आहे. १२ वर्षाच्या आयपीएलच्या इतिहासात या संघाने अनेक विक्रम नोंदविले आहेत.
पुणे इंडिया वॉरियर्सच्या विरुद्ध २०१३ मध्ये आरसीबी संघाने सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. गेलच्या तुफानी खेळीमुळे आरसीबीने २० षटकांत २६४ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. ही धावसंख्या पार करणे एक मोठे आव्हान आहे.
जास्तीत जास्त अंतिम सामने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर
इंडियन प्रीमियर लीगमधील एक संघ सातत्याने कामगिरी करताना दिसला आहे तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज संघ. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलधील सर्वोत्कृष्ट संघ ठरला आहे. आयपीएलच्या पहिल्याच सत्रात सीएसके संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
त्यानंतर सीएसकेने २०१० मध्ये प्रथमच विजेतेपद जिंकले. सीएसकेच्या संघाने आयपीएलच्या १० हंगामात एकूण ८ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. ज्यामध्ये ३ वेळा त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. चेन्नई संघाचा ८ वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम लवकर मोडला जाऊ शकतो असे वाटत नाही.
ख्रिस गेलच्या नावावर आहे सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या – १७५ धावा
ख्रिस गेल हा आयपीएलमधील एक स्फोटक फलंदाज आहे. विराट कोहलीपासून एबी डिव्हिलियर्स आणि रोहित शर्मा ते सुरेश रैना हे सर्व फलंदाज अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहेत. पण यापैकी कुठल्याही फलंदाजाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या केली नाही. परंतु विंडीजचा महान फलंदाज ख्रिस गेलने हा पराक्रम केला.
आयपीएलमधील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने २०१३ च्या मोसमात पुणे इंडिया वॉरियर्सच्या विरुद्ध १७५ धावांची तुफानी खेळी केली होती. यात त्याने १७ षटकार ठोकले. आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम गाठला नाही आणि कोणत्याही फलंदाजाला हा विक्रम मोडण्यासाठी कठिण प्रयत्न करावे लागतील.
विराट कोहलीने केल्या एका हंगामात ९७३ धावा
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागोमाग एक विक्रम गाठत आहे. तसेच आयपीएलमधेही कोहली विक्रमांना गवसणी घालत आहे. आयपीएलच्या पहिल्याच सत्रापासुन विराट कोहली आरसीबीमध्ये खेळत आहे. या संघाकडून खेळत त्याने अनेक धावा केल्या आहेत. विराट कोहलीसाठी आयपीएलचा २०१६ चा हंगाम खूपच अनोखा ठरला.
या मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने केवळ अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला नाही तर स्वत: कोहलीही यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे सिद्ध झाले. विराटने संपूर्ण हंगामात धावांचा जोरदार पाऊस पाडला आणि ९७३ धावा केल्या. त्यात त्याने ४ शतकेही ठोकले. आयपीएलच्या एका हंगामातील ह्या सर्वाधिक धावा आहेत. कोहलीचा हा विक्रम मोडणे फार कठीण आहे.
ख्रिस गेलने झळकावले ३० चेंडूत सर्वात जलद शतक
टी-२० क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस असलेल्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. या स्पर्धेत त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत जी मोडणे अवघड आहेत. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक शतके आहेत, त्यापैकी त्याने २०१३ च्या आयपीएल हंगामात अतिशय तुफानी फलंदाजी केली होती.
आयपीएलच्या त्या सत्रात ख्रिस गेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा डाव खेळत पुणे इंडिया वॉरियर्सविरूद्ध १७५ धावा केल्या. या दरम्यान त्याने केवळ ३० चेंडूत शतक ठोकले. गेलच्या या खेळीनंतर आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम गाठला नाही .
ट्रेंडिंग लेख –
एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू
५ अतिशय मोठे विक्रम, जे या आयपीएलमध्ये मोडले जाण्याची आहे दाट शक्यता
२०२०मध्ये बेंगलोर शंभर टक्के जिंकणार आयपीएल परंतू या ३ सुधारणा केल्यावरच
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपरकिंग्स पुढचा कर्णधार कोण होणार? अष्टपैलू खेळाडूंनी केला खुलासा
पाकिस्तान संघाची वार्षिक कमाई “हिट मॅन” च्या IPL कमाईच्या आहे अर्धी
धोनीच्या नेतृत्वाचा डीजे ब्राव्हो झाला फॅन, म्हणाला सीएसके माझे…