---Advertisement---

पंजाबची भरारी, आरसीबी-गुजरातला मोठा धक्का! पाँइंट्स टेबलमध्ये मोठे बदल!

---Advertisement---

आयपीएल पॉइंट्स टेबल 2025: शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज सामना पावसामुळे उशिरा झाला. त्यामुळे सामना 14-14 षटकांचा खेळवण्यात आला. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर अपयशी ठरली, पहिल्याच षटकात फिल साॅल्ट (4) बाद झाला. तिसऱ्या षटकात, विराट कोहली 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टिम डेव्हिडने 50 धावा करून आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले, अन्यथा संपूर्ण संघ 60 धावांवरच बाद झाल्यासारखे दिसत होते.

पंजाब किंग्जने आरसीबीने दिलेले 96 धावांचे लक्ष्य 11 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. 5 विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. नेहल वढेराने 19 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 33 धावा केल्या. ही खेळी महत्त्वाची होती कारण 53 धावांच्या धावसंख्येत 4 विकेट गमावल्यानंतर पंजाब किंग्जवरही दबाव आला. या विजयासह, पंजाब किंग्जने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे, तर आरसीबीची घसरण झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर होते. आरसीबीला 5 विकेट्सने पराभूत केल्यानंतर पंजाब दुसऱ्या स्थानावर आला आहे. श्रेयस अय्यर आणि संघाचा 7 सामन्यांमधील हा 5वा विजय आहे. त्यांचे 10 गुण आहेत, ज्यात त्यांचा नेट रन रेट +0.308 आहे.

या सामन्यापूर्वी आरसीबी तिसऱ्या स्थानावर होता, जो आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा हा 7 सामन्यांतील तिसरा पराभव आहे. त्यांचे 6 गुण आहेत, जरी त्यांचा नेट रन रेट (+0.446) अजूनही पंजाबपेक्षा चांगला आहे. सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर होता, जो आता तिसऱ्या स्थानावर आला आहे.

आज, शनिवार 19 एप्रिल रोजी आयपीएलमध्ये डबल हेडर आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात (GT vs DC) आहे. दुसऱ्या सामन्यात, राजस्थान रॉयल्स आणि लखनT सुपर जायंट्स (RR vs LSG ) यांच्यात सामना होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---