क्रिकेट हा भारतीय लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण आयपीएल स्पर्धेने या वर्षात सर्वात जास्त शोधला जाणारा विषय कोरोना व्हायरसला मागे टाकले आहे. गुगल इंडियाच्या यंदाच्या ‘ईयर इन सर्च 2020’ आकडेवारीनुसार बुधवारी (9 डिसेंबर) मागील वर्षी गुगलमध्ये शोधला गेलेला सर्वात पहिल्या स्थानी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 हा होता, आणि एक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा गुगल इंडियाच्या वर्षातील सर्वात जास्त शोधलेला यादीतील पहिला घटक आहे.
आयपीएल 2020 हा सर्वात जास्त शोधलेला कार्यक्रम होता. त्याच्यानंतर कोरोना व्हायरस, अमेरिका निवडणूक परिणाम, पंतप्रधान शेतकरी सन्मान विमा (पीएम शेतकरी योजना), बिहार निवडणूक परिणाम आणि दिल्ली निवडणूक परिणाम शोध इंजिनवरील शोधले गेलेले ट्रेंडिंग घटक आहेत.
आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोना काळात 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान युएईत यशस्वीपणे पार पडला. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी आयपीएल बघणाऱ्यांची संख्या विक्रमी 28 टक्के वाढली गेल्याची नोंद झाली आहे.
आयपीएल 2020 ही स्पर्धा सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेत पहिल्या स्थानी आहे. भारतीय टी-20 क्रिकेट लीगने युईएफए चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग, फ्रेंच ओपन, ला लीगा, सीरीए, ऑस्ट्रेलियन ओपन, एनबीए, युरोपा लीग आणि यूईएफए नेशन्स लीग मध्ये टॉप स्थान मिळवले.
यामध्ये भारतात 2020 ची पहिल्या 10 व्यक्तीत जागा मिळवणारा एकमात्र खेळातील व्यक्तींमध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान होता. तो आयपीएल 2020मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा भाग होता.
यावेळी सलग दुसर्यांदा मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. हा त्यांचा एकूण पाचवा किताब होता. याबरोबरच सम वर्षात मुंबई इंडियन्स संघाचा रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील पहिला विजय होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात