---Advertisement---

‘या’ दिवशी सुरू होणार आयपीएल धमाका! फेब्रुवारी ते मार्चमध्ये WPL चे आयोजन

On: बुधवार, जानेवारी 10, 2024 5:27 PM
IPL Trophy
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचसोबत वुमेंस प्रीमियरल लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम देखील यावर्षी आयोजित केला जाणार आहे. आता आयपीएल आणि डब्ल्यूपीएल 2024 हंगामाविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार डब्ल्यूपीएलचे आयोजन फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात, तर आयपीएलची सुरुवात मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते.

बीसीसीआयने आयपीएल (IPL) आणि डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धांच्या आगामी हंगामांसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. या लिलावत फ्रँचायजींनी खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च केले. आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करून आयपीएल आणि डब्ल्यूपीएल 2024 चे वेळापत्रक बनवल्याचे बोलले जात आहे. अद्यावर या स्पर्धांचे वेळापत्रक अधिकृतपणे समोर आले नाहीये. पण माध्यमांतील वृत्तांनुसार आयपीएल 2024 स्पर्धात 22 मार्च रोजी सुरू होऊ सकते. तसेच फेब्रुवारीच्या सेवटच्या आठवड्यात डब्ल्यूपीएलची सुरुवात होऊ शकते. डब्ल्यूसीएसचे सामने दिल्ली आणि बेंगलोर याठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. तर आयपीएलचे सामने 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जातील.

दरम्यान, याआधी 2009 आणि 2014 मध्ये भारतात लोकसभा निवडणुका असल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा देशाबाहेर आयोजित केली होती. 2009 साली आयपीएल दक्षिण आफ्रिकेत, तर 2014 साली सुरुवातीचे काही सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये भारतात लोकसभा निवडणुकी असतानाही बीसीसीआयने आयपीएल भारताबाहेर आयोजित केली नव्हती. यावेळीही भारतात 2024 लोकसभेच्या निवडणुका असतील. पण बीसीसीआय आयपीएलचे सर्व सामने देशात आयोजित करण्याच्या तयारीत आहे. यासाठी बोर्डाने रणनीतीही तयार केली आहे. (IPL and WPL 2024 Tournament Schedule)

महत्वाच्या बातम्या – 
धक्कादायक! खेळपट्टीवर धावताना फलंदाजाचे निधन, सहकाऱ्यांनी CPR देऊनही सोडले प्राण
Rashid Khan । भारताविरुद्धच्या मालिकेतून राशिद खानची माघार, जाणून घ्या सरावाला सुरुवात केल्यानंतर का घेतला निर्णय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---