आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) बाराव्या हंगामाचा लिलाव उद्या (18 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या लिलावात युवराज सिंग, सॅम करण यांच्यावर सगळ्यांची नजरा असणार आहेत. याचबरोबर विडींजचे शाय होप आणि शिमरॉन हेटमेयर यांना कोणता संघ विकत घेणार याकडेही सर्वाधिक लक्ष असणार आहे.
आजच (17 डिसेंबर) होपने बांगलादेश विरुद्ध जलद अर्धशतकी खेळी केली आहे. यावेळी त्याने 23 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 55 धावांची तुफानी खेळी केली.
हेटमेयरनेही भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत 259 धावा केल्या होत्या. त्याने गुवाहटीमध्ये झालेल्या वन-डे सामन्यात 78 चेंडूत 106 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने सहा षटकार आणि सहा चौकार मारले होते. तर दुसऱ्या वन-डेमध्ये 64 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 94 धावा केल्या होत्या.
यामुळे या दोन खेळाडूंवर सर्वाधिक लक्ष असणार आहे.
तसेच युवराजने रणजी ट्रॉफीमध्ये तमिळनाडू विरुद्ध अष्टपैलू खेळी केली आहे. त्याने 34 चेंडूत 41 धावा करत 2 विकेट्सही पटकावल्या आहेत. त्याला कोणता संघ घेतो हे पहाणेही औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?
–युवराजचा टी२० विक्रम थोडक्यात वाचला, शाय होपची षटकार-चौकारांची बरसात
–Video: आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मुरली विजयला कोहलीबद्दल असे काही बोलला की ऐकून थक्क व्हाल!