---Advertisement---

IPL Auction 2024: एका ओव्हरमध्ये 5 सिक्स देणाऱ्या गोलंदाजासाठी RCB मोजले तब्बल 5 कोटी, पाहा तो कोण

On: मंगळवार, डिसेंबर 19, 2023 6:39 PM
Yash Dayal
---Advertisement---

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे पार पडत आहे. आयपीएल 2024 हंगामासाठी मिनी लिलाव होत आहे. यामध्ये एकूण 333 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. त्यामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. या मिनी लिलावात अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या त्यातच 2023 हंगामात गुजरातकडून खेळणारा यश दयाल यानेही या लिलावासाठी आपले नाव दिले होते. मिनी लिलावा अगोदर गुजरातने त्याला रिलीज केले होते. यामध्ये त्याला खरेदी करण्यासाठी गुजरात आणि बेंगलोर यांच्यात चांगलीच चढाओढ चालली होती. पण या शर्यतीत बेंगलोरने बाजी मारली.

यश दयाल (Yash Dayal) याने या आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024) 20 लाख रुपयांची बेस प्राईज ठेवली होती. त्याला संघात घेण्यासाठी गुजरात (Gujrat Giants) आणि बेंगलोर (Royal Challengers Benglore) संघात चढाओढ लागली होती, पण अखेरीस बेंगलोरने (RCB) त्याला 5 कोटी रुपयात आपल्या संघाचा भाग बनवले. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 14 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याला 13 विकेट्स घेण्यात यश मिळाले. आयपीएल 2024चा हंगाम एप्रिल-मे मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. (IPL Auction 2024 RCB pays Rs 5 crore for bowler who hits 5 sixes in an over see who it is)

हेही वाचा

IPL 2024 Auction: वर्ल्डकपमध्ये कहर करणारा घातक वेगवान गोलंदाज ‘पलटण’च्या ताफ्यात, केवढे कोटी केले खर्च?
IPL Auction । वर्ल्डकपमध्ये नडलेला ‘हा’ खेळाडू आता रोहितसोबतच खेळणार; वेगवान गोलंदाजासाठी मुंबईचा मोठा खर्च

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---