---Advertisement---

IPL 2025 AUCTION; पहिल्या दिवशी 72 खेळाडूंची विक्री; पंत-अय्यर सर्वात महागडे, डेव्हिड वाॅर्नर अनसोल्ड

---Advertisement---

रविवारी पहिल्यादिवशी (24 नोव्हेंबर) आयपीएल 2025 साठी खेळाडूंच्या लिलावात फ्रेंचायझींनी मार्की खेळाडूंवर खूप पैसा खर्च केला. या लिलावात भारतीय खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळाले आहेत. केकेआरचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला मागे टाकत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात महागडा विकला जाणारा खेळाडू ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांना मेगा लिलावात खरेदी केले. या वर्षी आयपीएल जेतेपदासाठी कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करणारा कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्जमध्ये 26 कोटी 75 लाख रुपयांमध्ये सामील झाला.

केकेआरचा भाग असलेल्या व्यंकटेश अय्यरला पुन्हा त्याच संघाने 23 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले. केकेआर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात त्याच्यासाठी स्पर्धा होती. श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. अय्यरसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब यांच्यात बराच काळ स्पर्धा होती पण शेवटी पंजाबने बाजी मारली. अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला होता. त्याला केकेआरने गेल्या लिलावात 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल 2025 च्या लिलावात मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले.

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे 14 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2025 हंगामात आपापल्या संघांचे कर्णधार होऊ शकतात. अर्शदीप सिंगला राईट टू मॅच कार्ड वापरून पंजाबने 18 कोटी रुपयांना विकत घेतले. सनरायझर्स हैदराबादने 18 कोटी रुपयांची शेवटची बोली लावली होती पण आरटीएमद्वारे पंजाबने परत घेतले.

सर्वाधिक 110.5 कोटी रुपये असणाऱ्या पंजाबने लेगस्पिनर युझवेंद्र चहलला 18 कोटी रुपयांना आणि मार्कस स्टोइनिसला 11 कोटी रुपयांना विकत घेतले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लियाम लिव्हिंगस्टोनवर 8 कोटी 75 लाख रुपये खर्च केले. यावेळी पर्स 120 कोटी रुपयांची होती. जी तीन वर्षांपूर्वी झालेल्या मेगा लिलावापेक्षा 30 कोटी रुपये जास्त होती.

भारताच्या स्टार खेळाडूंपैकी केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने 12 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड (रु. 12.5 कोटी), भारताचा प्रसिध कृष्ण (रु. 9.5 कोटी), आवेश खान (9.75 कोटी), ट्रेंट बोल्ट आणि आर्चर (12.5 कोटी) यांना चांगला भाव मिळाला.

रविचंद्रन अश्विनला चेन्नई सुपर किंग्सने 9 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केले. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनाही चेन्नईने अनुक्रमे 6 कोटी 25 लाख आणि 4 कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियन आक्रमक फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कला पुन्हा दिल्ली कॅपिटल्सने आरटीएमद्वारे 9 कोटी रुपयांना विकत घेतले. सहा खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडे 41 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. दुखापतींनी त्रस्त झालेल्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला राजस्थानने 12.5 कोटी रुपयांना आणि श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महिश तिक्षानाला 4 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केले.

हेही वाचा-

IPL Mega Auction; 3 खेळाडू ज्यांना लिलावात मिळाली 20 कोटींपेक्षाही अधिक रक्कम!
ZIM vs PAK; झिम्बाब्वेने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्याच वनडे सामन्यावर वर्चस्व!
IPL Mega Auction; मुंबई इंडियन्स नाही, तर ‘या’ संघाकडून खेळणार इशान किशन!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---