येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला (Indian premier league ) प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बेंगलोरमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा मेगा ऑक्शन (Ipl mega auctions 2022) सोहळा पार पडला. या मेगा ऑक्शन सोहळ्यात भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंवर देखील फ्रँचायजींनी मोठी बोली लावण्यात मागे पुढे विचार केला नाही. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडा (kagiso rabada )आता आगामी हंगामात पंजाब किंग्स या संघात खेळताना दिसून येणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघातील वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला पंजाब किंग्स फ्रँचायजीने ९.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. मेगा ऑक्शनमध्ये त्याची मुळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याने गेल्या काही वर्षात दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु, आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला रिलीज केले होते. आता तो पंजाब संघाकडून गोलंदाजी करताना दिसून येईल.
अशी राहिली आहे कारकीर्द
कगिसो रबाडाने आयपीएल स्पर्धेत गेली २ वर्ष दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने या संघाचे प्रतिनिधित्व करताना सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि अंतिम षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने २०२० मध्ये झालेल्या हंगामात ३० गडी बाद केले होते. तर २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात एकूण १५ गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे
टीम इंडियाचा मालिका विजय; कर्णधार रोहितचा भीम पराक्रम, किंग कोहलीलाही टाकलंय मागे
IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे