बंगळुरू येथे आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा मेगा लिलाव सुरू असताना एक धक्कादायक बातमी पुढे आली. आयपीएल ऑक्शनर ‘ह्युज एडमिड्स‘ यांची प्रकृती अचानक खालावल्याने ते चालू कार्यक्रमात (IPL auctioneer Hugh Edmeades collapses during the auction) कोसळले होते. आता त्यांना कार्यक्रमादरम्यान नक्की काय झाले होते, याचे कारण पुढे आले आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
मेगा लिलावाच्या पहिला दिवसाचा (१२ फेब्रुवारी) पहिला सेक्शन व्यवस्थित पार पडला. या सेक्शनमध्ये मार्की खेळाडूंवर बोली लागल्या. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये अनकॅप्ड आणि कॅप्ड खेळाडूंचा लिलाव सुरू असताना ह्युज एडमिट्स अचानक खाली कोसळले. आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार पोस्ट्चरल हायपोटेन्शनमुळे (Postural Hypotension) ते अचानक खाली कोसळले आहेत.
पोस्ट्चरल हायपोटेन्शन म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती खूप वेळ बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर अचानक उठतो, तेव्हा कमी रक्तदाबामुळे तो व्यक्ती अचानक कोसळू शकतो.
https://twitter.com/KalpeshPraj80/status/1492434159997886467?s=20&t=5kswmlOoF93OHPUT9wPxxQ
महत्त्वाचे म्हणजे, आता ह्युज एडमिट्स यांची प्रकृती स्थिर असली तरीही चारू शर्मा पुढील लिलाव पार पाडणार आहेत. चारू शर्मा हे प्रो कबड्डी लीगचे डायरेक्टर आहेत.
Mr. Hugh Edmeades, the IPL Auctioneer, had an unfortunate fall due to Postural Hypotension during the IPL Auction this afternoon.
The medical team attended to him immediately after the incident & he is stable. Mr. Charu Sharma will continue with the Auction proceedings today. pic.twitter.com/cQ6JbRjj1P
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
आयपीएलचा मेगा लिलाव करणारे ह्युज एडमिड्स आहेत तरी कोण?
आयपीएल लिलावाची जबाबदारी खऱ्या अर्थाने ऑक्शनरवर असते. यामध्ये काही गफलत झाल्यास याचा तोटा सरळ संघांना भोगावा लागतो. त्याचसाठी बीसीसीआय जागतिक कीर्तीचे ऑक्शनर बोलावत असते. २००८ ते २०१७ या कालावधीत जगप्रसिद्ध ऑक्शनर रिचर्ड मेडली यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर २०१८ पासून आतापर्यंत ह्युज एडमिड्स हे काम पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वेलकम होम!! तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली लावत केकेआरने नितीश राणाला आपल्या ताफ्यात दिले स्थान
बिग ब्रेकिंग! आयपीएल लिलावात बोली प्रक्रिया पार पाडणारे ‘ह्युज एडमिड्स’ चालू कार्यक्रमात कोसळले