आयपीएलला सुरूवात होऊन 16 वर्षे झाली असून आतापर्यंत 17 हंगाम खेळले गेले आहेत. या लीगमध्ये कर्णधार करणे नेहमीच कठीण ठरले आहे. असे अनेक आंतरराष्ट्रीय कर्णधार आहेत जे या स्पर्धेत फ्लॉप ठरले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि भारताचा सौरव गांगुली यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून खूप यश मिळवले पण आयपीएलमध्ये ते अयशस्वी ठरले.
मात्र, आयपीएलच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीवर नजर टाकली तर ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आणि एमएस धोनीची नावे आघाडीवर आहेत. या दोघांनी कर्णधार म्हणून 5-5 वेळा जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. रोहितने मुंबई इंडियन्ससोबतही कामगिरी केली, तर धोनीने चेन्नई सुपर किंग्जसोबत सर्व विजेतेपद जिंकले. जर आपण आयपीएलच्या इतिहासातील सर्व कर्णधारांवर नजर टाकली तर असे फक्त 3 खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत पराभवाचा सामना करावा लागला नाही. या बातमीद्वारे आपण त्या खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
3. निकोलस पूरन
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला आयपीएल 2024 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने उपकर्णधार म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर त्याला हंगामात कर्णधारपदाची संधीही मिळाली. हंगामातील 11व्या सामन्यात राहुल पंजाब किंग्ज विरुद्ध प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळला आणि म्हणूनच निकोलस पूरनने कर्णधारपद स्वीकारले. या सामन्यात लखनऊ संघाने पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव केला.
2. सूर्यकुमार यादव
या यादीत टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे नावही सामील आहे. सूर्यकुमारने आयपीएलमध्ये केवळ एका सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे, पण त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आजारी असल्यामुळे आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्याचे नेतृत्व सूर्यकुमारने केले आणि मुंबई संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला.
1. रॉस टेलर
आयपीएलमध्ये कधीही न हरलेल्या कर्णधारांच्या यादीत न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरचाही समावेश आहे. टेलरने 2013 च्या हंगामात चेपॉक येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विजय मिळवून दिला. पुणे वॉरियर्सने हा सामना 24 धावांनी जिंकला. मात्र, त्यानंतर टेलर कधीही कर्णधार करताना दिसला नाही.
हेही वाचा-
दुर्दैवच..! पॅरालिम्पिकमधील भारताच्या सुवर्णपदकाची चर्चा का होत नाही?
मानलं भावा! गोल्डन बाॅय सुमितची पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
‘संपूर्ण जग थुंकेल…’, युवराज सिंगच्या वडिलांचा कपिल देववर खळबळजनक वक्तव्य