चार वेळा आयपीएल ट्रॉफी नावावर करणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. आयपीएल 2023 स्पर्धेत सीएसके संघाने पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मंगळवारी (दि. 23 मे) अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात पार पडला. हा सामना चेन्नईने 15 धावांनी जिंकला. यानंतर चेन्नईने विक्रमी 10व्यांदा आयपीएलचा अंतिम सामना गाठला. आता या सामन्यानंतर मथीशा पथिरानाचा आईसोबतचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
मथीशा पथिराना व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) दिसत आहे. या व्हिडिओत पथिराना आपल्या आईला मिठी मारताना दिसत आहे. खरं तर, पहिल्या क्वालिफायर सामन्यात सीएसकेने गुजरातला पराभवाचा धक्का दिला. यानंतर पथिराना खूपच भावूक झाला. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. याव्यतिरिक्त नेटकरीही या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
Pathirana and his Mom 🥹❤️#CSK pic.twitter.com/TtM5Flzjmw
— Bhuvan (@bhuvanChari007) May 24, 2023
गुजरात टायटन्सला पराभूत करत सीएसके अंतिम सामन्यात
या सामन्यातील पथिरानाच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने गुजरातविरुद्ध 4 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने 37 धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट्स आपल्या नावावर केल्या. यावेळी पथिरानाने गुजरातचे विस्फोटक फलंदाज विजय शंकर आणि मोहम्मद शमी यांची विकेट घेतली.
या सामन्यात गुजरातला विजयासाठी 173 धावांचे आव्हान होते. मात्र, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने 20 षटकात 157 धावांवरच नांग्या टाकल्या. अशाप्रकारे सीएसकेने गुजरातला 15 धावांनी पराभवाची धक्का देत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. चेन्नई संघ आधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे, त्यामुळे दुसरा क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ भिडतील. यातील जो संघ विजय मिळवेल, तो अंतिम सामन्यात चेन्नईविरुद्ध भिडेल. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (IPL chennai super kings pacer matheesha pathirana emotional video with her mother after csk vs gt match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपली प्लेऑफची आकडेवारी पाहून रोहितलाही वाटेल लाज! लखनऊविरुद्ध फक्त 11 धावांवर बाद
अटीतटीच्या सामन्यात टॉस जिंकून मुंबईचा बॅटिंगचा निर्णय, लखनऊपुढे ठेवणार का मोठे आव्हान?