वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज फलंदाज ख्रीस गेल इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या चालू हंगामात खेळत नाहीये. गेलने आयपीएल २०२२ मध्ये सहभाग घेतलेला नाही. तसेच मेगा लिलावात देखील त्याने स्वतःचे नाव नोंदवले नव्हते. अशात आयपीएल २०२३ मध्ये गेल खेळताना दिसू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. गेलने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून काही व्हिडिओ शेअर करून याविषयी संकेत दिले आहेत.
वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रीस गेलने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरीच्या माध्यमातून काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये लिहिले आहे की, आयपीएल २०२३ ची तयार करत आहे. असे असले तरीही गेलची ही स्टोरी पाहून तो आयपीएलच्या आगामी हंगामात तो खेळेल याची खात्री मात्र देता येत नाही. परंतू, जर त्याने पुनरागमन केले तर चाहते त्याच्या स्वागतासाठी सज्ज असतील. कारण त्याने आयपीएलमध्ये अनेकदा अविस्मरणीय खेळी साकारली आहे.
Chris Gayle Workout for IPL 2023? pic.twitter.com/q1S3afltPw
— Vikash Gaur 🇮🇳 (@thevikashgaur) March 29, 2022
ख्रीस गेल (Chris Gayle) आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळू शकतो. पण पुढचे दोन वर्ष आयपीएलचा लिलाव होणार नाहीये. अशात त्याला एखाद्या संघात बदली खेळाडूच्या रूपात सहभागी होता येऊ शकते. किंवा एखाद्या खेळाडूने माघार घेतल्यानंतर त्याला संघात घेऊ शकतात.
https://www.instagram.com/p/CShHcvrgGSV/?utm_source=ig_web_copy_link
गेलचे वय सध्या ४२ वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी तो ४३ वर्षाचा होईल. अशात तो सर्वात जास्त वयात आयपीएल खेळणारा खेळाडूही बनू शकतो. मागच्या आयपीएल हंगामात तो पंजाब किंग्जसाठी खेळला होता.
गेलच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने या टी-२० लीगमध्ये १४२ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १४१ डावांमध्ये ४९६५ धावा केल्या आहेत. त्याची सर्वात मोठी खेली १७५ धावांची आहे, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी देखील आहे. त्याने आयपीएलमध्ये १४८ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. आयपीएमध्ये गेलच्या नावावर ६ शतक आणि ३१ अर्धशतक आहेत. तसेच ४०५ चौकार आणि ३५७ षटकारांची नोंदही त्याच्या नावावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत
Video: विटांच्या वेगवेगळ्या रचना करताना दिसला चेन्नई संघ, धोनी-जडेजाचाही उपक्रमात सहभाग
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही