आयपीएल २०२१चा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने आहेत. या सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांना आयपीएल २०२१ चा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
मात्र, हाती आलेल्या वृत्तानुसार, ते अंतिम सामना पाहण्यासाठी येऊ शकणार नाहीत. सामन्यात केकेआरचा कर्णधार ऑयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आयपीएलनंतर दुबई येथेच येत्या २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान संघ टी२० विश्वचषकात एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. (IPL Final 2021 Ramiz Raja Invited To Watch IPL Final BCCI President Sourav Ganguly )
Ramiz Raja invited to watch IPL 2021 final
The invitation was extended by BCCI President Sourav Ganguly
Read more: https://t.co/K0f4NGIgVt#IPLFinal pic.twitter.com/Qt49efUboH
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) October 15, 2021
पाकिस्तान क्रिकेटच्या वृत्तानुसार, एशियन क्रिकेट काऊंसिलच्या बैठकीत गांगुलींनी राजा यांना अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले. मात्र, त्यांच्या येण्याची शक्यता नाहीये. बैठकीत दोघांनीही एशियन क्रिकेटच्या मजबूतीबाबत चर्चा केली. भारत आणि पाकिस्तान संघात सन २०१२ नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्हीही संघ मोठ्या स्पर्धांमध्ये एकमेकांचा सामना करतात. पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी आहे.
अशातच शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ युएई येथे पोहोचला आहे. तो पहिल्यांदाच टी२० विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत आहे. युएईला पोहोचण्यापूर्वी संपूर्ण संघाची तीनदा चाचणी केली होती. पाकिस्तान संघाने सन २००९ मध्ये टी२० विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. दुसरीकडे भारतीय संघानेही सन २००७ मध्ये टी२० विश्वचषक उंचावला होता. टी२० विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघात ५ सामने झाले आहेत. यातील सर्वच सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.
टी२० विश्वचषकात जगभरातील १६ संघ उतरणार आहेत. यातील सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईत खेळला जाईल. स्पर्धेच्या ७ व्या पर्वाचे सामने ओमान आणि युएईमध्ये खेळले जातील. सुरुवातीला या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे या स्पर्धेचे आयोजन युएईत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बीसीसीआयकडे अद्यापही स्पर्धेचे यजमानपद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-जर कोलकाता जिंकले, तर असा कारनामा करणारा मॉर्गन बनणार केवळ चौथा कर्णधार
-टी२० विश्वचषकापूर्वी विराटने रिषभ पंतला दिले चॅलेंज; पूर्ण न केल्यास होऊ शकते संघातून सुट्टी
-एकदम रॉयल! ‘या’ महागड्या हॉटेलात थांबणार भारतीय संघ; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लाजवाब’





