---Advertisement---

खुशखबर: कोरोनावर मात करून ‘हा’ खेळाडू झाला सीएसकेच्या ताफ्यात दाखल

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या कोरोना चाचणीचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे. ज्यामुळे तो संघाच्या हॉटेलमध्ये परतला आहे. इंडियन प्रीमियर लीगसाठी दुबईत पोहचल्यानंतर चाहरसह एक अन्य खेळाडू कोरोना विषाणूच्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळला होता.

चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन म्हणाले की, “दीपक चाहरच्या दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आणि त्यामुळे तो संघामध्ये परतला आहे.”

“बीसीसीआयच्या प्रोटोकॉलप्रमाणे आता त्याची कार्डियो टेस्ट होईल. जी त्याच्या रिकव्हरी बद्दल सांगेल. त्यानंतर आणखी एक कोव्हिड चाचणी होईल, ज्यामध्ये तो निगेटिव्ह आल्यावर सराव सुरू करू शकेल,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

चाहरला १४ दिवस दुसर्‍या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याच्यासह संघाच्या स्टाफमधील १२ सदस्य पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर संपूर्ण संघाचा क्वारंटाईन कालावधी वाढविण्यात आला होता. आणि त्यामुळे त्यांचे सरावसत्रही सर्वात उशिरा सुरू झाले होते.

-आयपीएलमध्ये एका गोलंदाजाला ४ नको ५ षटकांची द्या परवानगी, पहा कुणी केलीय ही मागणी

-दुबईत आयपीएलला गेलेला भारतीय खेळाडू आहे नाराज, म्हणाला…

-धोनी आणि कैफने मिळून फलंदाजला रनआऊट केलेला भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का?

ट्रेंडिंग लेख-

-विराट-डिविलियर्सच्या खांद्याला खांदा लावत हे २ धुरंदर यंदा आरसीबीला बनवणार विजेता

-घरात टीव्ही नसल्याने गल्लीत पान टपरीवर क्रिकेट पाहणारा मुलगा बनला टीम इंडियाचा कर्णधार..

आयपीएलच्या इतिहासातील ३ सर्वात रोमांचक अंतिम सामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---