कोरोना महामारीमुळे क्रिकेट बऱ्याच काळापासून बंद होते. पण आता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे सोबतच कॅरेबियन प्रीमियर लीग देखील सुरू झाली आहे. आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होईल.
परंतु, सध्या भारतीय खेळाडूंसोबतच आयपीएलमध्ये भाग घेणारे अनेक परदेशी खेळाडू पाच महिने झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. तरी, प्रत्येक फ्रेंचायझींची इच्छा आहे की आपल्या संघातील सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असावेत.
४ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौर्यावर ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जिथे ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू आपल्या फॉर्मची चाचपणी करतील. आयपीएलच्या अनुषंगाने, सर्व फ्रेंचायझींची आपल्या संघातील खेळाडूंवर करडी नजर असेल. तर, या लेखामध्ये आपण ऑस्ट्रेलियाच्या अशा चार खेळाडूंविषयी जाणून घेऊया जे आपल्या आयपीएल संघांसाठी खूप महत्वपूर्ण आहेत.
१) पॅट कमिन्स
आयपीएल २०२० च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला १५.५० करोड रुपयांच्या बोलीसह आपल्या संघात सामील करून घेतले होते. या बोलीसह कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला होता. यामुळे कोलकत्ता नाइट रायडर्स संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु हा वेगवान गोलंदाज कोरोना महामारीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
अशा परिस्थितीत तो लयीमध्ये आहे की नाही याबद्दल शंका निर्माण होते. परंतु त्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या संघाला सप्टेंबरपासून इंग्लंडबरोबर ३ टी२० व ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायचे आहे. या मालिकेसाठी सर्व क्रिकेट चाहते अत्यंत उत्सुक आहेत. त्यामुळे, कोलकाता नाईट रायडर्सचे बारीक लक्ष पॅट कमिन्सकडे लक्ष असेल. या मालिकेतूनच कमिन्सच्या गोलंदाजीची धार कशी आहे हे समजेल.
२) डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद पुन्हा एकदा तो सांभाळेल. आयपीएलमध्ये तीन ऑरेंज कॅप नावावर असणाऱ्या वॉर्नरकडून संघाला यावेळी देखील तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या एकूण कामगिरीत वॉर्नरचा वाटा खूप मोठा असतो. संघाच्या कर्णधारपदासोबतच सलामीला येऊन तो संघाला आक्रमक सुरुवात करून देण्यात माहीर आहे.
मात्र, बर्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला वॉर्नर आयपीएलपूर्वी इंग्लंडबरोबर खेळल्या जाणार्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत खेळताना दिसेल. युएईमध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवायचे असेल तर वॉर्नरचा इंग्लंडमधील फॉर्म कसा आहे हे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला पहावे लागेल.
३) स्टीव स्मिथ
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये पुन्हा एकदा राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व करताना दिसेल. पण, इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे स्मिथसुद्धा गेली पाच महिने क्रिकेटपासून दूर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो उत्कृष्ट कामगिरी करुन आपला फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करेल. स्मिथ इंग्लंडमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय हे राजस्थान रॉयल्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, स्मिथ संघाचा कर्णधार असला तरी, टी२० चा तितका आदर्शवत खेळाडू मानला जात नाही.
४) ग्लेन मॅक्सवेल
२०१४ मध्ये यूएईत झालेल्या आयपीएलच्या काही सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी केली होती. यावर्षी मॅक्सवेलचा समावेश पुन्हा पंजाबच्या संघात करण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे इतर खेळाडू क्रिकेट पासून दूर होते मात्र, त्याच्या काही दिवसआधी मॅक्सवेल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मॅक्सवेल व पंजाबसाठी इंग्लंड विरुद्ध होणारी मर्यादित षटकांची ही मालिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, पंजाबने १० कोटी इतकी मोठी रक्कम देऊन मॅक्सवेलला आपल्या संघात निवडले आहे.
ट्रेंडिंग लेख –
अगदी धोनीसहित या दिग्गजांच्या नशीबात टी२०त कधीही नव्हती मॅन ऑफ द मॅच
असे ३ क्रिकेटर, जे पुण्याच्या दोन वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून खेळले क्रिकेट
शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू
महत्त्वाच्या बातम्या –
नुकतेच २६७ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाच्या वडिलांविषयी पसरली अफवा, खरं काय ते घ्या जाणून
अश्विन पाँटिंगसोबत फोनवर नेमकं काय बोलला? यावेळी होणार खुलासा
अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार






