शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023चा मिनी लिलाव पार पडला. कोची येथे झालेल्या या लिवावात खेळाडूंवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमरून ग्रीन मुंबई इंडियन्स संघाच्या ताफ्यात सामील झाला. मुंबईने 23 वर्षीय ग्रीनला 17.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळूनही ग्रीनने खळबळजनक वक्तव्य केले आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
काय म्हणाला ग्रीन?
कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने आयपीएल 2023 (IPL 2023) लिलावातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कराराविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, एवढ्या मोठ्या करारानंतरही त्याच्यात किंवा त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही.
ग्रीन म्हणाला की, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं, तर मी एवढी मोठी रक्कम मिळण्यासाठी खूप काही केले आहे, असे मला वाटत नाही. मी फक्त माझे नाव लिलावात दिले आणि हे घडले. यामुळे कोणताही बदल होणार नाही की, मी कोण आहे किंवा मी काय विचार करतो. आशा करतो की, माझ्यात खूप बदल होणार नाही.”
विकेट्सचे पंचक
विशेष म्हणजे ग्रीनने सोमवारी (दि. 26 डिसेंबर) बॉक्सिंग-डे कसोटीत पहिल्यांदा कारकीर्दीतील विकेट्सचे पंचक पूर्ण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला 189 धावांवर रोखले होते.
Five-wicket haul for Cameron Green helps restrict South Africa to a modest total.
Watch #AUSvSA LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺#WTC23 | 📝 https://t.co/FKgWE9jUq4 pic.twitter.com/lYkL8O0Bnf
— ICC (@ICC) December 26, 2022
आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू
कोची येथे पार पडलेल्या आयपीएल 2023 मिनी लिलावात (IPL 2023 Mini Auction) कॅमरून ग्रीन आतापर्यंतचा दुसरा महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघाने बोली लावली. मात्र, यामध्ये मुंबईला यश आले. दुसरीकडे, इंग्लंड संघाचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्स संघाने 18.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. आता हे महागडे खेळाडू आयपीएल 2023मध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ipl history second most expensive player cameron green on his bought price read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भावा काहीतरी कर, पप्पी- किस घे…’, मोहम्मद कैफचा पुजाराला अजब सल्ला; मॅचविनरही खळखळून हसला
पाकिस्तानच्या 35 वर्षीय पठ्ठ्याचे 4 वर्षांनंतर पुनरागमन, मैदानावर उतरताच दाखवला दम; रिझवानची जागा धोक्यात