यावर्षी आयपीएलमध्ये (IPL) नव्याने सामील झालेल्या लखनऊ फ्रेंचायझीच्या (lucknow franchise) सहाय्यक प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय दहिया (vijay dahiya) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय दहिया यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रशिक्षक आहेत. ते उत्तर प्रदेशमधील युवा खेळाडूंची गुणवत्ता चांगल्या प्रकारे जाणतात आणि शक्यतो याच कारणास्तव त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी ते आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सचे देखील सहाय्यक प्रशिक्षक राहिले आहेत.
दहिया यांनी दिल्लीच्या रणजी संघाला देखील प्रशिक्षण दिले आहे. त्याचसोबत ते आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे टॅलेंट स्काउट देखील होते. या सर्व अनुभवांनंतर त्यांना लखनऊ फ्रेंचायझीने सहायक प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे आणि यासाठी ते आनंदी देखील आहेत. त्यांनी ही नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर लखनऊ फ्रेंचायझीचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “लखनऊ फ्रेंचायझीसोबत मला जे काम करण्याची संधी दिली गेली आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि मी त्यांचे आभार मानतो.”
काही दिवसांपूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने भारताचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला त्यांच्या संघाच्या मेंटॉरपदी नियुक्त केले होते. गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधील कारकीर्द पाहिली, तर ती जबरदस्त राहिली आहे. गंभीरने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे केले होते. त्याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर लखनऊ संघाला त्याच्या अनुभवाचा चांगला फायदा होऊ शकतो.
हेही वाचा- गौतम गंभीर आता दिसणार मेंटॉरच्या भूमीकेत, ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी
तत्पूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी दिग्गज एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे नाव निश्चित केले आहे. बीसीसीआयकडून फ्रेंचायझीला अनुमती मिळाल्यानंतर त्यांनी फ्लावर यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले होते. फ्लावर यापूर्वी पंजाब किंग्ज संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते.
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी बीसीसीआय मेगा लिलाव आयोजित करणार आहे आणि त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाऊ शकते. अशात मेगा लिवावात एंडी फ्लावर आमि गौतम गंभीर यांच्यावर एक चांगला संघ निवडण्याची महत्वाची जबाबदारी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
लहान मुलांचे अश्लील फोटो स्वतःजवळ ठेवायचा ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, आता झालाय ४ वर्षांचा तुरुंगवास
प्रो कबड्डी २०२१ : ‘यू मुंबा’कडून ‘बंगळुरु बुल्स’चा ४६-३० च्या फरकाने फडशा, हंगामात विजयी सलामी
व्हिडिओ पाहा –