पुणे। बुधवारी (६ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे होत आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ
आयपीएलच्या १५ व्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आत्तापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यातील २ सामने त्यांनी जिंकले आहेत, तर १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करवा लागला आहे. आता कोलकाता मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचा हंगामातील चौथा सामना खेळणार आहे.
या सामन्यासाठी कोलकाताच्या संभावित ११ जणांच्या (KKR Predicted 11) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास अंजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजी करू शकतात. त्याचबरोबर मधली फळी कर्णधार श्रेयससह (Shreyas Iyer) नितीश राणा, सॅम बिलिंग्स सांभाळू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून आंद्रे रसल आणि सुनील नारायण संघात असतील. गोलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी शिवम मावी, उमेश यादव, टीम साऊदी, वरूण चक्रवर्ती यांच्यावर असू शकते.
कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ – अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), आंद्रे रसल, सुनील नारायण, शिवम मावी, उमेश यादव, टीम साऊदी, वरूण चक्रवर्ती.
असा असू शकतो मुंबई इंडियन्सचा संभावित संघ –
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. मात्र, आयपीएलच्या १५ व्या हंगामात संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. मुंबईने आत्तापर्यंत या हंगामात खेळलेले दोन्ही सामने हारले आहेत. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या मुंबई विजयी पथावर येण्यास उत्सुक असेल. मुंबईला त्यांचा हंगामातील तिसरा सामना कोलकाता विरुद्ध खेळायचा आहे.
या सामन्यासाठी मुंबईच्या संभावित ११ जणांच्या (MI Predicted 11) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीप्रमाणे यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसह सलामीला फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा मधली फळी सांभाळू शकतात. अष्टपैलू म्हणून कायरन पोलार्डसह टिम डेव्हिड आणि डॅनिएल सॅम्स यांना संधी मिळू शकते. गोलंदाजीत मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी हे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
मुंबई इंडियन्सचा संभावित संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थंपी.
अशी असू शकते ड्रीम ११
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Kolkata Knight Riders vs Mumbai Indians) यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या ड्रीम ११ (Dream XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून इशान किशन आणि सॅम बिलिंग्सला संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाजीत श्रेयस अय्यर, नितीश राणा, तिलक वर्मा यांची निवड केली जाऊ शकते. तसेच अष्टपैलू म्हणून कायरन पोलार्ड, वेंकटेश अय्यर आणि टिम डेव्हिड यांची निवड होऊ शकतो. त्याबरोबर गोलंदाज म्हणून उमेश यादव, जसप्रीत बुमराह, टीम साऊदी यांना संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर कर्णधार म्हणून इशान किशनचा आणि उपकर्णधार म्हणून वेंकटेश अय्यरचा विचार केला जाऊ शकतो.
कर्णधार – इशान किशन
उपकर्णधार – वेंकटेश अय्यर
यष्टीरक्षक – इशान किशन आणि सॅम बिलिंग्स
फलंदाज – श्रेयस अय्यर, नितीश राणा, तिलक वर्मा
अष्टपैलू – कायरन पोलार्ड, वेंकटेश अय्यर, टिम डेव्हिड
गोलंदाज – उमेश यादव, जसप्रीत बुमराह, टीम साऊदी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
Video : आधी विराट मग सिराज नंतर सगळेच, वानखेडेवर RCBचे भिडू लागले नाचू
IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
स्वस्तात आऊट झाल्यावर तंबूत मॅक्सवेलची मालीश करताना दिसला विराट कोहली, Video तुफान Viral