जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची ओळख आहे. आयपीएल अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय बनलेली असते. खेळाडूंना लिलावात मिळणाऱ्या किंमतीविषयी चाहत्यांमध्ये खास आकर्षन असते. सध्या चर्चा होत आहे ती, म्हणजे आयपीएलच्या प्रसारण अधिकारांची (मीडिया राईट्स). रविवारी (१२ जून) हे अधिकारा विकण्यासाठी बीसीसीआयने लिलाव सुरू केला आणि समोवारी (१३ जून) हा लिलाव पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील माहितीनुसार पुढच्या वाच वर्षांसाठी बीसीसीआयने आयपीएलचे मीडिया राईट्स तब्बल ४४ हजार कोटी रुपयांमध्ये विकले आहेत. मागच्या वेळ बीसीसीआयला मीडिया राईट्साठी जी रक्कम मिळाली होती, त्याच्या तुलनेत यावेळी अडीच पट जास्त रक्कम मिळाली आहे. कोणत्या कंपनीने हे राईट्स मिळवले, याची अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. पण असे सांगितेल जात आहे की, टीव्ही राईट्स स्टार आणि डिजिटल राईठ्स वायाकाम १८ या कंपन्यांनी मिळवले आहेत.
बीसीसीआयने कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी
आता पुढचे म्हणजेच २०२३ ते २०२७ पर्यंतचे मीडिया राईट्स स्टार आणि वायाकाम १८ या दोन कंपन्यांकडे असतील. टीव्ही राईट्स मिळवणाऱ्या स्टार नेटवर्कला एका आयपीएल सामन्यासाठी ५७.५ कोटी (एकूण २३,५७५ कोटी रुपये) रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच डिजिटल राईट्स खरेदी केलेल्या वायाकाम १८ ला एका सामन्यासाठी ४८ कोटी (एकूण २०,५०० कोटी रुपये) रुपये मोजावे लागणार आहेत. हा करार पुढच्या ४१० आयपीएल सामन्यांसाठी झाला आहे, ज्याच्या मोबदल्यात बीसीसीआयला एकूण ४४,०७५ कोटी रुपये मिळतील.
आयपीएल बनली दुसरी सर्वात महागडी लीग
अमेरिकेची फुटबॉल लीग एनएफएल (National Football League) चे मीडिया राईट्स सध्यास्थितीत सर्वात महाग विकले गेले आहेत. एनएफएलच्या एका सामन्यासाठी त्यांना १३३ कोटी रुपये मोबदला मिळतो. आता या यादीत बीसीसीआयची आयपीएल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. आयपीएलच्या एका सामन्याची किंमत आता १०७.५ कोटी झाली आहे. इंग्लिश प्रीमियर लीग या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या एका सामन्याची किंमत ८५.८ कोटी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हार्दिक सध्याचा सर्वात वैविध्यपूर्ण खेळाडू’, भारताच्या माजी प्रशिक्षकाने केली पंड्याची प्रशंसा
रिषभ पंतच्या भारतीय संघाला ‘या’ चुका पडल्या भारी, गमावली सलग दुसरी टी२०