सोमवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. मात्र, रोहित शर्माला दुखापतीमुळे एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहित आता आयपीएलमधूनही माघार घेणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. परंतू, याचदरम्यान आता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबाबत एक फोटो ट्विट करून सर्वांनाच गोंधळात टाकले आहे.
सोमवारी रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्थान न देण्याबद्दल बीसीसीआयने ट्विट केले होते की ‘बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्मा आणि इशांत शर्माच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे’. हा ट्विट केल्यामुळे रोहितच्या आयपीएल माघारीबद्दल चर्चा रंगू लागल्या. बीसीसीआयच्या या ट्विटमुळे रोहितची दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तवली जात होती. रोहितला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
मात्र, याचदरम्यान सोमवारी रात्री मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर रोहित नेटमध्ये सराव करत असल्याचे फोटो टाकले आहेत. ज्यात त्यांनी, ‘आजच्या सराव सत्रात हिटमॅन पुन्हा ॲक्शनमध्ये. आम्हाला त्याला अशा स्थितीत पाहायला आवडतं’ असं म्हटलं आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1320773924964069377
मुंबई इंडियन्सकडून असं ट्विट करण्यात आलं असले, तरीही तो दुखापतीतून सावरला आहे की नाही याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, त्यांच्या या ट्विटवरुन तो दुखापतीतून बरा झाला असून त्यामुळेच आता सरावासाठी उतरला असल्याचा कयास लावला जात आहे.
आता रोहितबद्दल इंडियन्सने असे ट्विट केले असले, तरीही बीसीसीआयच्या सुत्रांचे म्हणणे मात्र काही वेगळेच आहे. रविवारी बीसीसीआय सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेला सांगितले की “हे खूप दुर्दैवी आहे की रोहित आयपीएलमध्ये भाग घेणार नाही. तो भारतात परत जाणार असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काही दिवस दाखल होईल. तेथे तो दुखापतीतून सावरण्यासाठी काम करेल.”
त्यामुळे आता नक्की रोहितच्या दुखापतीचा अहवाल काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा
भुवी, इशांतची दुखापत पडली पथ्यावर, पहिल्यांदाच मिळाले कसोटी संघात स्थान
टीम इंडियाचा उपकर्णधार झाला ‘हा’ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतली रोहितची जागा
ट्रेडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण