---Advertisement---

शाहरुख, प्रीतीनंतर आता बॉलिवूडची ‘ही’ जोडी आयपीएलमध्ये करणार गुंतवणूक, नव्या फ्रँचायझीवर लावणार बोली!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 1:02 PM
---Advertisement---

नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धेचा शेवट झाला आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने जोरदार विजय मिळवत चौथे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. यानंतर आता आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या हंगामात आपले आवडते खेळाडू दुसऱ्या संघात खेळताना दिसून येऊ शकतात. कारण आतापर्यंत या स्पर्धेत ८ संघ सहभाग घेत होते. परंतु आगामी हंगामात आणखी २ नवीन संघाचा समावेश केला जाणार आहे. हे संघ खरेदी करण्यासाठी अनेक मोठमोठी नावे समोर आली आहे. दरम्यान या यादीत बॉलिवुडच्या दोन दिग्गजांचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धेत दोन नवीन संघांचा समावेश होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी हे संघ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये मँचेस्टर युनायटेड आणि फॉर्म्युला १ च्या मालकांचा देखील समावेश आहे. आता सर्वांना आश्चर्यचकित करणारी बातमी म्हणजे, बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचेदेखील या यादीत नाव जोडले जात आहे. यासह भारतातील प्रसिद्ध जिंदल स्टीलच्या मालकांनी देखील आयपीएल संघ खरेदी करण्यात रुची दाखवली आहे. टेंडर जमा करण्याची शेवटची तारीख २o ऑक्टोबर होती.

आऊटलुकच्या वृत्तानुसार, ‘दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी देखील आयपीएलचा नवीन संघ खरेदी करण्यासाठी टेंडर जमा केले आहे.’ आयपीएल आणि बॉलिवुड कनेक्शन हे काही नवीन नाहीये. यांचे खूप जुनं नातं आहे. यापूर्वी देखील जुही चावला आणि शाहरुख खान यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघ खरेदी केला होता. तर प्रीती झिंटाने पंजाब आणि शिल्पा शेट्टीने राजस्थान रॉयल्स संघ खरेदी केला होता.

तसेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे खेळांशी खूप जुने नाते आहे. दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण ऑल इंडिया बॅडमिंटन चॅम्पियन होते. तर रणवीर सिंग देखील आता प्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लबसोबत जोडला गेला आहे. यासह तो एनबीएचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) टेंडर साठी अर्ज स्विकारण्याची तारीख ३१ ऑगस्ट ठरवली होती. त्यानंतर ही तारीख वाढवून १० ऑक्टोबर करण्यात आली होती. तसेच तिसऱ्यांदा ही तारीख वाढवून २० ऑक्टोबर करण्यात आली होती. अर्ज खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये किंमत ठेवण्यात आली होती. हे पैसे पुन्हा दिले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

ट्रिंग ट्रिंग.. त्याची निवड करा; धोनीच्या एका फोन कॉलमुळे ‘या’ भारतीय शिलेदाराची टी२० विश्वचषक संघात वर्णी?

पाकिस्तानी दिग्गजाची शाहीनला कोपरखळी; म्हणाले, भारताच्या बुमराहपुढे आफ्रिदी जणू लहान बाळच!

मैदानाबरोबरच स्टेडियमकडेही असतील दर्शकांच्या नजरा, भारत-पाक सामन्याला क्रिकेटर्सच्या पत्नी अन् प्रेयसी लावणार हजेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---