आयपीएल 2023 मध्ये यश दयालचे नाव खूप चर्चेत आले होते. पण दुर्दैवाने चुकीच्या कारणांसाठी. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने एका षटकात सलग पाच षटकार खावे लागले. या प्रसंगाने यश दयालच्या करिअरला मोठा झटका बसला, त्यासोबतच त्याचा अत्मविश्वासावासावर देखील मोठा परिणाम झाला. या घटनेनंतर गुजरात टायटन्सने त्याला पुढील हंगामासाठी आपल्या संघात ठेवले नाही आणि यशची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले.
परंतु, नंतर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने यश दयालला संधी दिले. आरसीबीने त्याला आयपीएल 2024 मध्ये 5 कोटी रुपयांत खरेदी केले ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु विराट कोहलीच्या पाठिंब्याने यश दयालच्या करिअरने नवे वळण घेतले. विराट कोहलीने यशला केवळ आत्मविश्वासच दिला नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वातावरणात त्याला जूळवून घेतले.
यश दयालने विराट कोहलीने आपला आत्मविश्वास कसा निर्माण केला हे सांगितले. स्पोर्ट्स तकशी बोलताना दयाल म्हणाला, “त्याने (कोहली) मला सांगितलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो संपूर्ण हंगामात मला पाठिंबा देईल. त्याने मला सांगितले की मी नवीन ठिकाणी आलो आहे. असे मला वाटणार नाही. आणि त्याने पूर्णपणे मला पाठिंबा दिला. हे माझ्यासाठी एक मोठे प्रोत्साहन होते आणि तो तरुण खेळाडूंशी खूप चांगले बोलतो. मला असे वाटत नाही की तो, लोक टीव्हीवर जे बोलतात त्यापेक्षा वेगळे आहे.
विराट कोहलीच्या या पाठिंब्याचा परिणाम मैदानावर दिसून आला. यश दयालने आयपीएल 2024 च्या मोसमात आरसीबीसाठी चमकदार कामगिरी केली. त्याने 15 विकेट्स घेत संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कामगिरीने त्याने आपल्या समीक्षकांनाच चुकीचे सिद्ध केले नाही. तर आपली क्षमताही दाखवून दिली.
हेही वाचा-
लेडी बुमराह! शाळेतल्या मुलीनं कॉपी केली जसप्रीत बुमराहची बॉलिंग ॲक्शन; VIDEO व्हायरल
एकेकाळी पैसे उधार घेऊन खेळायचा टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू! जाणून घ्या संघर्षमयी प्रवास
जय शाह पहिले नसतील! यापूर्वी हे 4 भारतीय बनले आहेत आयसीसीचे अध्यक्ष, एक जण महाराष्ट्रातील