सध्या गाैतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. यापूर्वी, गंभीर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक होता. त्याआधीही गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता. गंभीरनंतर लखनऊ फ्रँचायझीमध्ये कोणताही नवीन मार्गदर्शक आला नाही. मात्र, आता त्या जागी झहीर खानबाबत चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झहीर खान लखनऊमध्ये गंभीरची रिक्त जागा घेण्याची शक्यता आहे.
लखनऊ सुपर जायंट्समध्ये मार्गदर्शका व्यतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षकाचीही कमतरता आहे. आता संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलने देखील पद सोडले आहे. मॉर्केलही भारतीय क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग बनला आहे. अशा परिस्थितीत झहीर खान मेंटॉरच्या भूमिकेत अधिकच फिट दिसतो, कारण तो संघाच्या गोलंदाजांना प्रशिक्षणही देऊ शकतो.
ZAHEER KHAN SET TO REPLACE GAUTAM GAMBHIR IN LSG.
– LSG and Zaheer in talks for the role of mentor in the IPL. (Cricbuzz). pic.twitter.com/yjeU8oITCG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 19, 2024
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, झहीर खान आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये चर्चा सुरू आहे. तथापि, लखनऊ सुपर जायंट्स किंवा झहीर खानने या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. आता लखनऊ सुपर जायंट्स या माजी भारतीय वेगवान गोलंदाजाला मार्गदर्शक बनवतात की नाही हे पाहणे मनोरंजक असणार आहे.
भारताच्या माजी गोलंदाजाने 2000 ते 2014 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याने टीम इंडियासाठी 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत झहीरने 32.94 च्या सरासरीने 311 विकेट घेतल्या. याशिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.43 च्या सरासरीने 282 विकेट घेतल्या, तर आंतरराष्ट्रीय टी-20 च्या उर्वरित 17 डावांमध्ये त्याने 26.35 च्या सरासरीने 17 बळी घेतल्या आहेत.
हेही वाचा-
कोलकाता प्रकरणावरून सौरव गांगुलीचा चढला पारा, पोस्ट व्हायरल
दुलीप ट्राॅफीमध्ये रिंकूला का नाही मिळाली संधी? स्वत:च केला मोठा खुलासा
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात परतणार शमी? जय शहा म्हणाले…