---Advertisement---

‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…

On: सोमवार, नोव्हेंबर 2, 2020 7:49 PM
---Advertisement---

रविवारी(२ नोव्हेंबर) राजस्थान रॉयल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ६० धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांचे आयपीएल २०२० मधील आव्हानही संपुष्टात आले. त्यांनी या आयपीएल हंगामात १४ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले तर ८ सामन्यात पराभव स्विकरला. एवढेच नाही तर त्यांना आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

राजस्थान याआधी कोणत्याच आयपीएल हंगामात गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला नव्हता. मात्र रविवारी त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा नेटरनरेट चेन्नई सुपर किंग्ज पेक्षाही खाली घसरला. त्यामुळे त्यांना शेवटच्या स्थानावर जावे लागले.

आत्तापर्यंत झालेल्या आयपीएलच्या १३ हंगामात ७ संघ किमान एकदा तरी साखळी फेरीच्या शेवटी गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर राहिले आहेत. तर सध्या आयपीएलमध्ये सक्रिय असलेल्या ८ संघांपैकी केवळ ३ संघ असे आहेत, जे एकदाही शेवटच्या स्थानावर राहिलेले नाही.

दिल्ली सर्वाधिकवेळा शेवटच्या स्थानी.

साखळी फेरीच्या शेवटी गुणतालिकेत सर्वाधिकवेळा शेवटचे स्थान मिळवण्याचा नकोसा विक्रम दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेविल्स) यांच्या नावावर आहे. ते ४ आयपीएल हंगामात शेवटच्या स्थानी होते. त्यांच्या पाठोपाठ किंग्ज इलेव्हन पंजाब असून ते ३ वेळा शेवटच्या स्थानावर राहिले आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर २ वेळा तर कोलकाता नाईट रायडर्स, डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी १ वेळा शेवटच्या क्रमांकावर राहिले आहेत.

हे ३ संघ कधीच राहिले नाही शेवटच्या स्थानावर –

सध्या आयपीएलमध्ये सक्रिय असलेल्या ८ संघांपैकी केवळ ३ असे संघ आहेत जे आत्तापर्यंत कधीही साखळी फेरीच्या शेवटी गुणतालिकेत तळातील स्थानावर राहिलेले नाही. ते ३ संघ म्हणजे ४ वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स, ३ वेळचे आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि आयपीएल २०१६ चे आयपीएल विजेते सनरायझर्स हैदराबाद, हे ३ संघ.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून सर्वांना वाटलं मी निवृत्त होतोय’, ‘कॅप्टन कूल’ धोनीचे मोठे वक्तव्य

IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे

प्ले ऑफ अभी दूर नहीं! ३ जागा, ३ संघ आणि २ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे

ट्रेंडिंग लेख-

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---