इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये रविवारी ( 8 नोव्हेंबर ) दुसरा क्वालिफायार सामना होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल.या सामन्याआधी हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने सलामीवीर वृद्धीमान साहाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
हैदराबादने केले पुनरागमन, तर दिल्लीने मागील काही सामन्यात केली खराब कामगिरी
लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात खराब कामगिरी केल्यानंतर हैदराबादने पुनरागमन केले होते. याचे श्रेय कर्णधार डेविड वॉर्नरला जाते. त्याने आपल्या खेळाडूंचा योग्य प्रकारे वापर केला. दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सुरवातीला 7 सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर मागील सहा सामन्यांत दिल्लीला पाच पराभवांचा सामना करावा लागला.
स्पर्धेच्या 13 व्या हंगामात दिल्लीने प्रथमच अंतिम फेरीपर्यंत मजल मारावी असा अय्यरचा प्रयत्न असेल. दुसरीकडे वॉर्नरला 2016 मधील यशाची पुनरावृत्ती करून संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवायचे आहे.
…तर हा मान हैदराबादला मिळेल
जर वॉर्नर पुढील दोन सामने जिंकू शकला, तर स्पर्धेत कमीतकमी अनुभवी खेळाडू असणाऱ्या संघाने किताब पटकावण्याचा मान हैदराबादला मिळेल.
दिल्लीची वरच्या फळीतील फलंदाजी आहे चिंतेचा विषय
दिल्लीच्या संघासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाज. सलामीवीर शिखर धवनने (15 सामन्यांत 525 धावा) एकूण चांगली कामगिरी बजावली असली तरी शेवटच्या काही सामन्यात तो मोठा डाव खेळू शकला नाही. वेगवान गोलंदाजीविरूद्ध युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (13 सामने, 228 धावा) यालाही काही खास कामगिरी करता आलेली नाही.
अनुभवी अजिंक्य रहाणेने ( 7 सामने, 111 धावा ) आतापर्यंत फक्त एका सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. आता या स्पर्धेत धवन चारवेळा, पृथ्वी शॉ तीनवेळा आणि रहाणे दोनवेळा खाते न उघडताच तंबूत परतले आहे. संघाचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग सलामीवीर फलंदाजांच्या या खराब फॉर्ममुळे नाराज आहेत.
दिल्लीच्या गोलंदाजांनी केली उत्तम कामगिरी
मुंबई इंडियन्सविरुद्धचा पहिला क्वालिफायर सामना वगळता दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. कागिसो रबाडा (25 बळी), एन्रीच नॉर्किए (20 बळी) आणि रविचंद्रन अश्विन (13) यांनी चांगली कामगिरी केली आहे.
वृद्धिमान साहा या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी -होल्डर
दिल्लीचा अष्टपैलू जेसन होल्डर याने गोलंदाजी सोबत फलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. होल्डर म्हणाला की, “आम्ही आक्रमक सुरुवात करुन फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. वॉर्नरला वृद्धिमान साहाने उत्तम साथ दिली. जॉनी बेयरस्टोनेही चांगली कामगिरी केली आणि मनीष पांडेनेही लय कायम ठेवली. संघात केन विल्यमसनसारखा शांत मनाचा फलंदाज आहे. दुखापतीमुळे साहा एलिमिनेटर सामन्यात संघाचा भाग नव्हता आणि क्वालिफायर सामन्यातही त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे.”
श्रीवत्स गोस्वामीवर विश्वास
या स्पर्धेच्या सहा सामन्यात होल्डरने 13 बळी घेतले आहेत. पुढे बोलताना तो म्हणाला की, “सलामीवीर श्रीवत्स गोस्वामीवर आमचा विश्वास आहे. तो बर्याच दिवसांपासून संघाचा भाग आहे, त्याचा आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे.”
हैदराबादची गोलंदाजी उत्तम
हैदराबादकडे संदीप शर्मा, होल्डर, टी नटराजन यांच्यासारखे उत्तम वेगवान गोलंदाज आहेत. रशिद आणि शाहबाज नदीम हे फिरकीपटूदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. संदीपने पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली असून अखेरच्या षटकांत नटराजनने चांगली कामगिरी केली आहे. मधल्या षटकांत रशिद बर्यापैकी किफायतशीर ठरला.
हैदराबादची मधल्या फळीतील फलंदाजी कमकुवत
संघातील एकमेव कमकुवत भाग म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजी होय. युवा फलंदाज प्रियम गर्ग आणि अब्दुल समद सारख्या तरूणांना त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठे आव्हान पार करावे लागेल.
दिल्ली कॅपिटल्स:
श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमीयर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल , तुषार देशपांडे, रिषभ पंत, हर्षल पटेल, केमो पॉल, अमित मिश्रा, एन्रीच नॉर्किए, डॅनियल सॅम्स.
सनरायझर्स हैदराबाद:
डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत गोस्वामी, विराटसिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलन, पृथ्वीराज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, बासिल थंपी.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
ट्रेंडिंग लेख –
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?