---Advertisement---

नाद करायचा नाही! जडेजाने केवळ अफलातून धावबादच केले नाही, तर दोन भन्नाट झेलही घेतले, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 11:45 PM
---Advertisement---

मुंबई। शुक्रवारी(१५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने एकतर्फी जिंकला. पंजाबने दिलेले १०७ धावांचे आव्हान चेन्नईने १६ षटकांतच पूर्ण केले. चेन्नईच्या या विजयाबरोबरच या सामन्यात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने केलेल्या क्षेत्ररक्षणाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.

चेन्नई संघाचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग असलेल्या जडेजाने या सामन्यात एक धावबाद आणि २ झेल घेत पंजाबला १०६ धावांवर रोखण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

जडेजाने केएल राहुलला केले धावबाद

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब संघाने पहिली विकेट मंयक अगरवालच्या रुपात पहिल्याच षटकात गमावली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकात रविंद्र जडेजाच्या चपळाईमुळे पंजाबचा कर्णधार केएल राहुलही केवळ ५ धावांवर धावबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला.

झाले असे की तिसऱ्या षटकात दिपक चाहर गोलंदाजी करत असताना पाचव्या चेंडूवर गेलने बॅकवर्ड पाँईंटच्या दिशेने फटका खेळला. यावेळी गेल आणि राहुलने चोरटी एक धाव घेण्याचा प्रयन्त केला. मात्र, तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने चपाळाईने चेंडू पकडत तो थेट स्टंपवर मारला. त्यामुळे राहुल क्रिजमध्ये पोहचण्याआधीच चेंडूने स्टंपवरील बेल्स उडवल्या होत्या.

https://twitter.com/Jegathe15282502/status/1383063295389622273

जडेजाने दोन अफलातून झेल

जडेजाने केएल राहुलला केवळ धावबादच केले नाही तर नंतर २ उत्तम झेलही घेतले. त्याने ख्रिस गेलचा आणि शाहरुख खानचा झेल घेतला.

पंजाबच्या ५ व्या षटकात दिपक चाहरने दुसरा चेेंडू ‘नकल बॉल’ टाकला होता. हा चेंडू ओळखायला गेल चूकला आणि चेंडू त्याच्या बॅटला लागून बॅकवर्ड पाँइंटला उडाला, त्यावेळी तिथे उभा असलेल्या जडेजाने उजवीकडे हवेत उडी घेत अफलातून झेल घेतला. त्यामुळे आक्रमक फलंदाज गेलला १० धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागेल.

https://twitter.com/worldofvignesh/status/1383063799431778310

गेलनंतर जडेजाने शाहरुख खानचा २० व्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर झेल घेतला. त्यावेळी एका बाजूने पंजाबच्या विकेट्स जात असताना शाहरुखने दुसऱ्या बाजूने लढावू वृत्ती दाखवत ४७ धावांची खेळी केली. पण शेवटच्या षटकात शाहरुखने पहिल्या चेंडूवर मारलेल्या फटक्यामुळे चेंडू डिप मिडविकेटला गेला. यावेळीही तिथे जडेजा होता. त्याने त्यावेळी कोणतीही चूक न करता हा सहज सोपा झेल घेतला. त्यामुळे शाहरुखचे अर्धशतक केवळ ३ धावांनी हुकले.

https://twitter.com/KirketVideoss/status/1383079815511638019

चेन्नईचा विजय 

मुंबईतील वानखेडे स्टेडियवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर रोखले. त्यामुळे चेन्नईसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान चेन्नईने १५.४ षटकांत ४ विकेट गमावत सहज पूर्ण केले.

चेन्नईच्या या विजयात दिपक चाहरच्या ४ विकेट्स, तसेच मोईन अली(४६) आणि फाफ डू प्लेसिसने(३६) केलेली अर्धशतकी भागीदारी महत्त्वाची ठरली.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

एका सामन्यात समालोचन करण्याचे किती मानधन मिळते? चाहत्याच्या प्रश्नाला माजी क्रिकेटरचे भन्नाट उत्तर

दिल्लीविरुद्ध रोमहर्षक विजयानंतर राजस्थानने ड्रेसिंग रुममध्ये असा केला विजयाचा जल्लोष, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---