---Advertisement---

“राहुल तेवतियाच्या मूर्तीची पंजाब संघाने पुजा केली पाहिजे”

Virender-Sehwagh-And-Rahul-Tewatia
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १६व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने असे जबरदस्त प्रदर्शन केले, जे पाहून प्रत्येकजण त्याच्या चाहता बनला आहे. क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज आणि इतरही क्षेत्रांमधील नामांकित व्यक्तींकडून त्याचे कौतुक केले जात आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) खेळला गेला. या सामन्यात गुजरातने ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तेवतियाची सर्वत्र चर्चा होऊ लगाली. माजी दिग्गज विरेंद्र सेहवागने तर तेवतियाची एक मूर्ती बांधण्याचा सल्लाच दिला आहे.

शुक्रवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राहुल तेवतिया (Rahul Tewatia) गुजरात टायटन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना तेवतिया स्ट्राईकवर होता. अशा दबावाच्या प्रसंगी फलंदाजाकडून चूक होण्याची शक्यता अधिक असते, त्याच्यासोबत मात्र असे काही होताना दिसले नाही. ओडियन स्मिथच्या या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर तेवतियाने लागोपाठ दोन षटकार ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला.

त्याच्या जा निर्भीड खेळीनंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) देखील त्याचा चाहता बनल्याचे दिसत आहे. सेहवागने थेट तेवतियाची मूर्ती उभी करण्याचा सल्ला दिला आहे. सेहवाने यासाठी जागाही ठरवली आहे. पंजाब किंग्जच्या डगआउटमध्ये तेवतियाची मूर्ती बनवण्याचा सल्ला सेहवागने दिला आहे. सोबतच त्याला ‘लॉर्ड’ अशी उपाधीही दिली आहे.

स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करत सेहवागने लिहिले की, “वाह लॉर्ड तेवतिया…पंजाब किंग्जच्या डगआउटमध्ये तर याची मूर्तीच असली पाहिजे.”

https://twitter.com/virendersehwag/status/1512491150258499585?s=20&t=YV6LPpAvgDr5ezxMTJymtw

दरम्यान,  सामन्याचा विचार केला तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. शेवटच्या दोन चेंडूत तेवतियाने मारलेले दोन षटकार पाहून चाहत्यांचे खरोखर परिपूर्ण मनोरंजन झाले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कशी नशीबाने थट्टा आज मांडली! मैदानात सोडा नेट्समध्येही विराट फेल, बॅट उगारत व्यक्त केला संताप

गुजरातच्या ‘मॅच विनर’ तेवतियाला महान कर्णधाराने दिले नवे नाव; म्हणाले, ‘त्याच्या रक्तातच…’

युएईत आयपीएल गाजवलेल्या ऋतुराजला मानवेना भारतातील हवामान; आकडेवारीच देतेय साक्ष

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---