पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळाले नाही. तेव्हा संपूर्ण देशाची निराशा झाली होती. नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची सर्वाधिक अपेक्षा होती पण त्याला फक्त रौप्य पदकच जिंकता आले. अशाप्रकारे भारताची ऑलिम्पिक मोहीम कोणत्याही सुवर्णपदकाविना संपुष्टात आली. यानंतर सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला देश ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही जिंकू शकत नाही, अशी जोरदार चर्चा झाली. भारत हे क्रीडा राष्ट्र कसे नाही आणि लोकांना फक्त क्रिकेटच कसे आवडते, अशा अनेक समस्यांवर, वादातम्क विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे भारत ऑलिम्पिकमध्ये खूप मागे आहे.
आता पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. अवनी लेखरा हिने नेमबाजीत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. तिने सुवर्णपदकासह पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले आणि यानंतर भारताला आणखी दोन सुवर्णपदक मिळाले. नितीश कुमारने बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तर सुमितने भालाफेक मध्ये गोल्ड मेडल जिंकले. अशा प्रकारे भारताला एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके मिळाली आहेत.
अवनी लेखरा हिने सुवर्णपदक जिंकले तेव्हा त्याबद्दल थोडी चर्चा झाली होती. पण नितीश कुमार आणि सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक जिंकल्याची फारशी चर्चा नाही. या कारणामुळे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने सुवर्ण जिंकले आहे. पण आपण या पदकाबद्दल बोलत नाही असे त्याने म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या इंस्टाग्रामवर नितीश कुमार यांचा फोटो शेअर करताना हे पोस्ट केले आहे.
View this post on Instagram
आपण बघितले तर ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांवर प्रत्येकाचे लक्ष असते पण फार कमी लोक पॅरालिम्पिककडे लक्ष देतात. तर पॅरालिम्पिकमध्ये भारताचा इतिहास खूप चांगला आहे आणि भारताने पॅरालिम्पिकमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. प्रत्येक वेळी भारताला ऑलिम्पिकपेक्षा पॅरालिम्पिकमध्ये जास्त पदके मिळतात.
हेही वाचा-
मानलं भावा! गोल्डन बाॅय सुमितची पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
‘संपूर्ण जग थुंकेल…’, युवराज सिंगच्या वडिलांचा कपिल देववर खळबळजनक वक्तव्य
Paralympics 2024: सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 7 पदके; या खेळातून आशा