---Advertisement---

स्वप्नभंग! आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात पराभवाला समोरे जावे लागलेले आजपर्यंतचे संघ

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 12:53 AM
---Advertisement---

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची शुक्रवारी सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी बाजी मारली आणि चौथ्यांचा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. मात्र, कोलकाताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या होत्या आणि कोलकातासमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकात ९ बाद १६५ धावाच करता आल्या. कोलकाताचा हा आयपीएल इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना होता. याआधी त्यांनी खेळलेल्या दोन्ही आयपीएलच्या अंतिम सामन्यात विजय मिळवले होते. पण यंदा, त्यांना अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

त्यामुळे कोलकाता आयपीएलमध्ये उपविजेता ठरलेला ८ वा संघ ठरला. आत्तापर्यंत सर्वाधिक ५ वेळा चेन्नई सुपर किंग्स संघ उपविजेता ठरला आहे. चेन्नईला २००८, २०१२,२०१३,२०१५ आणि २०१९ या वर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या लेखात आपण आत्तापर्यंत आयपीएलमध्ये उपविजेत्या ठरलेल्या संघाबद्दल जाणून घेऊ.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंतचे उपविजेते –
२००८ – चेन्नई सुपर किंग्स
२००९ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१० – मुंबई इंडियन्स

२०११ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१२ – चेन्नई सुपर किंग्स
२०१३ – चेन्नई सुपर किंग्स
२०१४ – किंग्स इलेव्हन पंजाब
२०१५ – चेन्नई सुपर किंग्स

२०१६ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१७ – रायझिंग पुणे सुपर जायंट्स
२०१८ – सनरायझर्स हैदराबाद
२०१९ – चेन्नई सुपर किंग्स
२०२० – दिल्ली कॅपिटल्स
२०२१- कोलकाता नाईट रायडर्स

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नईने जिंकले चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद! पाहा आजपर्यंतचे विजेते संघ

भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज

नवा विक्रमवीर! पहिल्या हंगामात बनलेला ‘तो’ पराक्रम ऋतुराजने केला आपल्या नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---